Pune: दुसऱ्या मजल्यावरून पडली चिमुरडी, डोक्याला मार, डॉक्टरच बनले देवदूत, 24 तासांचा थरार!

Last Updated:

Pune News: पुण्यात तीन वर्षाची चिमुरडी घराच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडली. 1 तासांच्या अवघड शस्त्रक्रियेनंतर तिला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं.

+
पुण्यात

पुण्यात दुसऱ्या मजल्यावरून पडली चिमुरडी, डोक्याला मार, देवदूतांनी कसं वाचवलं? पाहा 24 तासांचा थरार!

पुणे – मोशी परिसरातील एक काळजाला चटका लावणारी घटना नुकतीच घडली. गायत्री सूर्यवंशी ही तीन वर्षांची चिमुरडी खेळता खेळता दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडली. या अपघातानंतर ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. पालकांनी तात्काळ तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी तिला औंध येथील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन येथे हलवण्यात आले. तिच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली असून डॉक्टरांच्या प्रयत्नांनी प्रकृती स्थिर आहे.
रुग्णालयात दाखल करताना गायत्री कोमात होती. सीटी स्कॅन तपासणीत तिच्या कवटीला फ्रॅक्चर असल्याचे दिसून आले. सुदैवाने या दुखापतीमुळे मेंदूवर गंभीर दाब निर्माण झाला नव्हता. मात्र, तिच्या मेंदूतील रक्तस्रावामुळे प्रकृती चिंताजनक होती. तिला बाल अतिदक्षता विभाग (PICU) मध्ये दाखल करण्यात आले आणि डॉ. मिलिंद जंबगी, डॉ. शिजी चालीपट आणि न्यूरोसर्जन डॉ. अभिजीत घंगाळे यांच्या देखरेखीखाली 24 तास ठेवण्यात आले.
advertisement
गायत्रीच्या मेंदूवरील दाब कमी करण्यासाठी आणि रक्ताची गाठ काढण्यासाठी तिच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. घंगाळे यांच्या नेतृत्वाखाली शस्त्रक्रिया सुमारे एक तास चालली आणि तिच्या मेंदूने चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे तिची प्रकृती स्थिर झाली आणि काही दिवसांनंतर तिला घरी सोडण्यात आले.
advertisement
डॉ. जंबगी म्हणाले की, “प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. वेळेत निदान व उपचार मिळाल्यामुळे आज गायत्रीचे आयुष्य वाचले.” पालकांना सूचना दिली की, “अपघातानंतर बेशुद्धावस्था, उलटी, रक्तस्त्राव, फिट्स यासारखी लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी.” ही संपूर्ण घटना अत्यंत धक्कादायक होती. अंकुरा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी वेळेवर योग्य उपचार करून मुलीला नवे आयुष्य दिले. त्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune: दुसऱ्या मजल्यावरून पडली चिमुरडी, डोक्याला मार, डॉक्टरच बनले देवदूत, 24 तासांचा थरार!
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement