Chess Competition: साडेचार वर्षाच्या चिमुकल्याची कमाल, एकाच वेळी 21 खेळाडूंसोबत खेळला बुद्धिबळ, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर शहरातील एका साडेचार वर्षाच्या चिमुकल्याने एकाच वेळी 21 खेळाडूंसोबत बुद्धिबळ खेळून नवीन विक्रम तयार केलेला आहे. विशेष म्हणजे याने एकाच वेळी 21 मुलांसोबत हा गेम खेळलेला आहे.
छत्रपती संभाजीनगर : बुद्धिबळ हा खेळ एक सर्वात अवघड खेळांपैकी एक खेळ समजला जातो. मोठ्या मोठ्या खेळाडूंना सुद्धा बुद्धिबळ खेळताना घाम सुटतो. छत्रपती संभाजीनगर शहरातील एका साडेचार वर्षाच्या चिमुकल्याने एकाच वेळी 21 खेळाडूंसोबत बुद्धिबळ खेळून नवीन विक्रम तयार केलेला आहे. विशेष म्हणजे याने एकाच वेळी 21 मुलांसोबत हा गेम खेळलेला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात राहणारा वल्लभ अमोल कुलकर्णी या शाळेच्या चिमुकल्याने एकाच वेळी शहरातील 21 खेळाडूंसोबत बुद्धिबळ खेळलेला आहे. वल्लभचे वडील सांगतात की, जेव्हा तो अगदी लहान होता, अडीच वर्षांचा, तेव्हा तो जे अवघड अवघड पझल्स असतात.
advertisement
तो एकदम लवकर सोडत होता आणि आम्हाला असं वाटलं की एवढ्या लहान वयामध्ये तो एवढ्या अवघड पझल्स कसे सोडतो. म्हणून आम्ही ठरवलं की त्याला सुद्धा आपण चेसमध्ये आणावे. म्हणजे आम्ही ठरवण्यापेक्षा त्याला स्वतःला चेस खेळण्याची खूप आवडत होती, कारण की वल्लभचा मोठा भाऊ हा देखील बुद्धिबळ खेळतो आणि त्याच्यापासूनच त्यालाही प्रेरणा मिळालेली आहे.
advertisement
वल्लभने तब्बल 2 तास 21 खेळाडूंसोबत लढत दिली. यामधील 12 खेळाडूंसोबत विजय, 5 खेळाडूंसोबत बरोबरी, 4 पराजय असा अंतिम निकाल आला. अतिशय चांगल्या पद्धतीने हे सर्व गेम त्यांनी खेळलेले आहेत. अंडर सेवन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये वल्लभने भाग घ्यावा आणि त्यामध्ये ही चॅम्पियनशिप जिंकावी अशी आमची इच्छा आहे, असं वल्लभची आई म्हणाली आहे. त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू आणि यामध्ये त्याला पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं देखील त्याची आई म्हणाली आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
July 11, 2025 8:58 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
Chess Competition: साडेचार वर्षाच्या चिमुकल्याची कमाल, एकाच वेळी 21 खेळाडूंसोबत खेळला बुद्धिबळ, Video

