मोक्का लावला म्हणून गुंड टिप्या बिथरला, हर्सूल कारागृहात राडा,पोलीसांच्या कॉलरला घातला हात

Last Updated:

आरोपी टिप्याला सुनावणीच्या वेळी मकोकाची कारवाई केल्याची माहिती मिळाली, तेव्हापासूनच तो बिथरला होता.

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : हर्सूल कारागृह परिसरात गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे . माझ्यावर मोक्का का लावला? असे म्हणत छत्रपती संभाजीनगर मधील कुख्यात गुंड टिप्या उर्फ जावेद शेखने कारागृहात पोलिस हवालदारासह साक्षीदाराला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचे समोर आलंय.
याप्रकरणी त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणि शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याचा गुन्हा हर्सूल पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. टिप्याच्या या सगळ्या कारनाम्यांमुळे काही महिन्यांपूर्वी त्याची शहरातून धिंड काढण्यात आली. तरीही तो काही थांबत नव्हता. शहरात खून करण्याचा प्रयत्न करणे, दहशत माजवणे अशा घटना वारंवार करत असल्यामुळे टिप्यावर मकोकाची कारवाई केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीच्या वेळी त्याला मोक्काची कारवाई केल्याची माहिती मिळाली. तेव्हापासूनच तो बिथरला होता.
advertisement

धक्काबुक्की करण्यास सुरुवात

सुनावणी पूर्ण होऊन बाहेर आल्यापासून त्याने कुरबुर सुरू केली होती. त्याची वारंवार समजूत घालूनदेखील तो ऐकत नव्हता. दुपारी दोनच्या सुमारास त्यास पुन्हा कारागृहात डांबत असताना त्याने गेटवरच गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड करून माझ्यावर मकोकाची कारवाई कशी काय केली? असे म्हणत त्याने शिवीगाळ सुरू करून कारागृहात जाण्यास नकार दिला. त्याला समजावून सांगणाऱ्या उपनिरीक्षक कैलास जाधव यांच्यासह साक्षीदाराला त्याने धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली.
advertisement

पोलिसांचा बंदोबस्त मागवून त्याला कारागृहात डांबले 

काही वेळातच त्याने जाधव यांची कॉलर पकडून 'बाहेर आल्यावर तुला बघून घेतो' अशी धमकी दिली. टिप्याचा माज उतरत नसल्याचे बघून अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त मागवून त्याला कारागृहात डांबले.

टिप्यावर तब्बल २३ गुन्हे दाखल 

तब्बल २३ गुन्हे, तीन वेळा एमपीडीए टिप्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, मारहाण, विनयभंगाचे तब्बल २३ गुन्हे दाखल आहेत. त्याला तीन वेळा एमपीडीएअंतर्गत कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. मात्र,तरीही त्याच्या वागण्यात फरक पडला नाही. अखेर, पोलिसांनी त्याची परिसरात पायी धिंड काढत त्याच्या घरासमोरून फिरवले होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोक्का लावला म्हणून गुंड टिप्या बिथरला, हर्सूल कारागृहात राडा,पोलीसांच्या कॉलरला घातला हात
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement