शेतकरी कर्जमाफीविषयी चर्चा सुरू असताना फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले, आज...

Last Updated:

Devendra Fadanvis: झालेल्या नुकसानाची शंभर टक्के नुकसानभरपाई शक्य नाही मात्र शेतकरी उभा राहिला पाहिजे यासाठी मदत करण्याबाबत राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्य सरकारने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३१ हजार कोटींची मदत जाहीर केली असून दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत मिळेल असे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंत एनडीआरएफच्या रकमेच्यावर वाढीव १० हजारांची हेक्टरी मदत देत असल्याचे फडणवीस म्हणाले. दुसरीकडे संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीकडे सरकारने तूर्त तरी दुर्लक्ष केले.
अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागाचे मोठे नुकसान झाले. आम्ही जागेवर जाऊन पाहणी केली, दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तातडीची मदत म्हणून धान्य वाटप आणि इतर मदत दिली. २२०० कोटी देऊन पीक नुकसानीबाबत पाऊले उचलली आहेत. अनेक ठिकाणी जमीन खरवडून गेली आहे. झालेल्या नुकसानाची शंभर टक्के नुकसानभरपाई शक्य नाही मात्र शेतकरी उभा राहिला पाहिजे यासाठी मदत करण्याबाबत राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
advertisement

शेतकरी कर्जमाफी कधी करणार आहात? फडणवीस म्हणाले...

शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर केल्यानंतर पत्रकारांनी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवर प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले, "राज्यातील नुकसानग्रस्त भागाला आम्ही भेटी दिल्या. त्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सध्या लगोलग कर्जमाफीपेक्षा त्यांना थेट मदत करणे हे जास्त महत्त्वाचे आहे. आम्ही कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे हे खरे आहे. आम्ही आमच्या आश्वासनापासून दूर जाणार नाही" असे म्हणत योग्य वेळी कर्जमाफी करू, असाच पुनरुच्चार त्यांनी अप्रत्यक्षपणे केला.
advertisement

कोणत्या शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार? मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

-नव्याने घर बांधणीस मदत करणार असून प्रधानमंत्री आवास योजनांमधून नव्याने घरं बांधून देणार आहोत.
-अंशत: पडझड झालीय त्यांना देखील मदत करणार आहोत.
-गाळ भरलेल्या विहिरींसाठी 30 हजार
-मृत्यू पावलेल्या प्रत्येक दुधाळ जनावरामागे 37,500 रुपयांची मदत करणार
-कुक्कुटपालनासाठी प्रति कोंबडी 100 रुपयांची मदत
advertisement
-खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 3 लाख 50 हजारांची भरीव मदत
-पीक विमा कंपन्यांकडून योग्य नुकसानभरपाई मिळवून देण्याचे राज्य सरकारचे आश्वासन
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शेतकरी कर्जमाफीविषयी चर्चा सुरू असताना फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले, आज...
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement