Devendra Fadnavis Uddhav Thackeray : राजसोबत भेटीची चर्चा, CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फोन, राजकारणात मोठी घडामोड...
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:प्रशांत लीला रामदास
Last Updated:
Devendra Fadnavis Uddhav Thackeray : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई/ नवी दिल्ली: मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतसंस्था निवडणुकीत ठाकरे ब्रॅण्डला धक्का बसल्यानंतर आज राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा सुरू होती. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येत असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. राज यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या फोनबाबत माहिती दिली. संजय राऊत यांनी सांगितले की, राजनाथ सिंह, देवेंद्र फडणवीस यांचा फोन उद्धव ठाकरेंना आला होता. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने फडणवीसांनी ठाकरेंना फोन केला होता. राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधण्याची जबाबदारी भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. या फोन कॉलमध्ये त्यांनी उद्धव यांना एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली असल्याची माहिती राऊत यांनी दिली.
advertisement
मुख्यमंत्री फडणवीसांना राज भेटले, राऊत म्हणतात...
आज, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. ठाकरे गटाकडून या भेटीवर सावध प्रतिक्रिया देण्यात आली. संजय राऊत यांनी या भेटीबाबत म्हटले की, राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस अनेकदा भेटले आहेत. कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील. राज्यातील विविध प्रश्नावर चर्चा सुरू असेल, असे त्यांनी म्हटले.
advertisement
इतर संबंधित बातमी:
view comments
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 21, 2025 11:16 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis Uddhav Thackeray : राजसोबत भेटीची चर्चा, CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फोन, राजकारणात मोठी घडामोड...


