Eknath Shinde : महायुतीचा दणदणीत विजय, एकनाथ शिंदेंचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

Last Updated:

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळालं आहे. 288 पैकी 230 जागांवर महायुतीचा विजय झाला आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या जनतेला पत्र लिहिलं आहे.

महायुतीचा दणदणीत विजय, एकनाथ शिंदेंचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र
महायुतीचा दणदणीत विजय, एकनाथ शिंदेंचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळालं आहे. 288 पैकी 230 जागांवर महायुतीचा विजय झाला आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या जनतेला पत्र लिहिलं आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला भरभरून मतदान केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडका शेतकरी, युवा, ज्येष्ठ नागरिक यांनी शिवसेनेवर मतांच्या माध्यमातून जो स्नेहाचा वर्षाव केला, जो विश्वास दाखवला तो आम्ही कधीही विसरणार नाही. आपण आमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. चला महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा एकदा सज्ज होऊया..पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार..! अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदेंनी मतदारांचे आभार मानलेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पत्र
प्रिय मतदार,
बंधू आणि भगिनींनो..
विधानसभा निवडणुकांच्या निकालात आपण शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीच्या पदरात भरभरून दान दिलं. आपणाला कोटी कोटी धन्यवाद... आपण शिवसेनेसह महायुतीच्या घटकपक्षांवर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू.
वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार वाटचाल करणाऱ्या शिवसेनेला मतदारांनी दिलेला कौल हा आम्ही गेल्या अडीच वर्षात केलेल्या विकासामुळे मिळाला आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा वसा, देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे आम्हाला मिळत असलेले मार्गदर्शन आणि सहकार्य यामुळे महायुती सरकार अधिकच भक्कमपणे कार्य करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विकसीत भारत संकल्पनेला वास्तवात आणण्यासाठी महायुती २४x७ कार्यरत राहील.
advertisement
महाराष्ट्रातील लाडक्या बहीणी, लाडके भाऊ, लाडका शेतकरी, युवा, ज्येष्ठ नागरिक यांनी शिवसेना महायुतीवर आपल्या मतांमधून जो स्नेहाचा वर्षाव केला आहे तो आम्ही कधीच विसरणार नाही. आपला महाराष्ट्र सदैव अग्रेसर राहण्यासाठी आमचा यापुढेही प्रयत्न राहील.
80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही शिवसेनेची कार्यपद्धत आहे, त्यानुसार महाराष्ट्रातील सामाजिक पाया भक्कम करतानाच राज्यातील महिला, युवा, शेतकरी गरिबांच्या कल्याणासाठी भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची ताकद आपण आम्हाला दिली आहे. आम्ही आपल्या ऋणात राहून महाराष्ट्राच्या कल्याणासाठी झटत राहू, अशी ग्वाही देतो.
advertisement
या निवडणुकीत शिवसैनिकांनी घेतलेल्या मेहनतीचं हे फळ आहे. महायुती सरकारने अडीच वर्षात केलेलं काम गावोगावी, नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम शिवसैनिक आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे.
रात्रीचा दिवस करून आपण टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी आम्हाला आपलं भक्कम पाठबळ मिळालं आहे. चला महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा सज्ज होऊया. पुनश्च एकदा आपले आभार...
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde : महायुतीचा दणदणीत विजय, एकनाथ शिंदेंचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement