Weather Update: पुढचे 48 तास धोक्याचे! पाऊस नाही, पण हाडं गोठवणारी थंडी वाढणार, या जिल्ह्यांत अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगडमध्ये थंडीची तीव्र लाट, महाराष्ट्र सीमेलगत अलर्ट. तामिळनाडू केरळमध्ये पाऊस, मुंबईत निचांकी तापमान १८.६ अंश सेल्सिअस नोंदवले.
महाराष्ट्राशेजारच्या राज्यांमध्ये थंड वाऱ्यांमुळे थंडच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे. मध्य प्रदेश राजस्थान इथे तापमान आणखी घसरणार असून थंड वाऱ्यांमुळे 15 नोव्हेंबरपर्यंत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये अरबी समुद्रातून येणाऱ्या खाऱ्या वाऱ्यांमुळे पाऊस राहणार आहे. 13-14 नोव्हेंबर रोजी तामिळनाडू आणि केरळमध्ये पाऊस राहील. महाराष्ट्रात पावसाचा कोणताही अंदाज नाही, मात्र तीव्र थंडीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान तज्ज्ञ, शशिकांत मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या भारतावर तीन सायक्लोनिक सर्क्युलेशनचं धोका आहे. पश्चिम बंगालच्या खाडीकडून तामिळनाडूच्या दिशेनं हे सायक्लोनिक सर्क्युलेशन पुढे सरकत आहे. तर दुसरं हरियाणाच्या वरच्याबाजूला आहे. तिसरं आसामच्या आसापास आहे. पुढच्या पाच दिवसात तापमान आणखी घसरणार आहे. 3 डिग्रीपर्यंत तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचे दोन दिवस हवामानत कोणताही बदल होणार नाही.
advertisement
आजपासून पुढचे 48 तास पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये थंडीची तीव्र लाट येईल त्याच पार्श्वभूमीवर यलो अलर्ट दिला आहे. महाराष्ट्राच्या सीमेलगत असणाऱ्या गावांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. 15 नोव्हेंबर आणि 16 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडू शकते. 17 ते 20 नोव्हेंबर दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात मात्र 17 नोव्हेंबरपर्यंत तरी पावसाचा कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही.
advertisement
पुढील दोन ते तीन दिवसांत मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात थंडीची लाट येण्याची आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात रात्रीचे तापमान कमी होण्याची शक्यता आहे.. जळगावात तीव्र थंडीची लाट असून नाशिक आणि यवतमाळ थंडीच्या लाटेकडे झुकत आहे. बुधवारी मुंबईचे किमान तापमान १८.६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून, नोव्हेंबर महिन्यातील थंडीच्या मोसमात आतापर्यंत नोंदवण्यात आलेले हे निचांकी किमान तापमान आहे.
advertisement
मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली परिसरात सोमवारपर्यंत किमान तापमान १८ ते २० अंश असेल, तर, महामुंबईत काही दिवस सकाळी आल्हाददायक वातावरण राहील, अशी माहिती हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे. उकाड्यापासून सुटका मिळाल्याने मुंबईकर सुखावला आहे. गुलाबी थंडीची मजा घेण्यासाठी मुंबईकर मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडताना दिसत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 13, 2025 7:03 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Update: पुढचे 48 तास धोक्याचे! पाऊस नाही, पण हाडं गोठवणारी थंडी वाढणार, या जिल्ह्यांत अलर्ट


