काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत 23 उमेदवार, मुंबईत तीन जागा लढणार, कुणाचा पत्ता कट, कुणाला संधी?

Last Updated:

Congress Candidate Second List : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केलीय. या यादीत २३ नावे असून आतापर्यंत एकूण ७१ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

काँग्रेस
काँग्रेस
मुंबई : काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१ उमेदवार जाहीर केले आहेत. यात पहिल्या यादीत ४८ तर दुसऱ्या यादीत २३ उमेदवारांची नावे आहेत. काँग्रेसने मुंबईत ३ जागांवर उमेदवार दिले आहेत. तर दुसऱ्या यादीत काही नवे आणि जुने चेहरे आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची शुक्रवारी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर काही जागांवर शिक्कामोर्तब झाले.
मुंबईत तीन जागांवर उमेदवार
काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत मुंबईतील तीन जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. यात कांदिवली पूर्वमधून काळु बधेलिया, चारकोप यशवंत सिंग आणि सायन कोळीवाडा मतदारसंघात गणेश यादव यांना तिकीट दिलं आहे.
नात्यागोत्यात तिकीट
अकोटमधून सुधाकर गणगणे यांचे पुत्र महेश गणगणे यांना तर अर्नी मतदारसंघातून शिवाजीराव मोघे यांचे पुत्र जितेंद्र मोघे यांना तिकीट दिलं आहे. सावनेरमध्ये सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी दिली आहे.
advertisement
कुणाचा पत्ता कट, कुणाला संधी?
काँग्रेसने श्रीरामपूरचे विद्यमान आमदार लहू कानडे यांचा पत्ता कट केला आहे. तिथं हेमंत ओगले यांना संधी देण्यात आलीय. याशिवाय राळेगावमधून माजी मंत्री वसंत पुरके यांना पुन्हा उमेदवारी दिलीय. तर यवतमाळमध्ये कमी फरकारने गेल्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या बाळासाहेब मांगुळकर यांना तिकीट दिलं आहे.
advertisement
महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांमध्ये ९०-९०-९० फॉर्म्युला ठरला असल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं. आतापर्यंत काँग्रेसनं ७१ तर शिवसेना ठाकरे गटाने ८० उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शऱद पवार गटाकडून ४५ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत 23 उमेदवार, मुंबईत तीन जागा लढणार, कुणाचा पत्ता कट, कुणाला संधी?
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement