Dasara 2023 : महाराष्ट्रातलं असं हे गाव जिथे होते रावणाची पूजा, काय आहे नेमकं कारण?

Last Updated:

विजयादशमीचा दिवस भारतात रावणरुपी पुतळ्याचं दहन करून साजरा केला जातो, पण अकोला जिल्ह्यातल एक गाव याला अपवाद आहे.

महाराष्ट्राच्या या गावात दसऱ्याच्या दिवशी होते रावणाची पूजा
महाराष्ट्राच्या या गावात दसऱ्याच्या दिवशी होते रावणाची पूजा
कुंदन जाधव, प्रतिनिधी
अकोला, 23 ऑक्टोबर : विजयादशमी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय, याच दिवशी रामाने रावणाचा शेवट करून सत्यावर विजय मिळवला. विजयादशमी हा दिवस भारतात रावणरुपी पुतळ्याचं दहन करून साजरा केला जातो, पण अकोला जिल्ह्यातल एक गाव याला अपवाद आहे. अकोल्यातल सांगोळा, असं एक गाव आहे जिथे याच दिवसाला रावणाची पूजा केली जाते. संपूर्ण गाव या दिवशी रावणाची पूजा करायला एकत्र येतं, आरती करण्यात येते हार घालून विधिवत पूजाही केली जाते.
advertisement
महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात सांगोळा गाव आहे. अकोला शहरापासून जवळपास 45 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. हजार दीड हजार लोकसंख्या असणार सांगोळा गाव रावणाचं गाव म्हणून ओळखलं जात. गावामध्ये प्रवेश केल्याबरोबर डाव्या बाजूला ओट्याच्या चौथाऱ्यावर काळ्या पाषाणाची भव्य मूर्ती दृष्टीस पडते. ही दशमुखी रावणाची मूर्ती आहे.
जवळपास 300 वर्षांपूर्वी याठिकाणी रावणाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. या मूर्तीला दहा तोंड आहेत, दहाही तोंडाच्या मस्तकावर मुकुट, हातामध्ये तलवार आहे, मूर्तीच्या इतर भुजांमध्ये आणखी शस्त्र आहेत. मूर्ती युद्ध पेहरावात आहे. नेमकी रावणाची मूर्ती याठिकाणी कशी आली? याची इतिहासामध्ये नोंद नाही. पण मूर्ती इथपर्यंत कशी आली याविषयी गावकरी आख्यायिका सांगतात.
advertisement
गावातील ग्रामदैवतेसमोर झाडाची दगडी मूर्ती तयार करण्यास प्रतिष्ठित नागरिकांनी शिल्पकाराला सांगितलं. मुर्तीकाराने मूर्ती घडवली, पण शिल्पकाराकडून झाडाची न बनता 10 तोंडी रावणाची प्रतिकृती तयार झाली. सांगितल्याप्रमाणे मूर्ती तयार झाली नसल्याने गावकरी शिल्पकारावर नाराज झाले. बैलगाडीवर मूर्तीला घेऊन ते गावामध्ये आले. गावाची हद्द सुरु होताच बैल थांबले, कुठल्याच परिस्थितीत बैल गावामध्ये प्रवेश करत नव्हते . शेवटी गावकऱ्यांना गावाच्या वेशीवरच नारळ फोडून मूर्तीची स्थापना केली, अशी अख्यायिका गावकरी सांगतात.
advertisement
गावात हनुमानाचं मंदिर असल्याने हि मूर्ती गावात गेली नसावी, अशी गावकाऱ्यांकडून मूर्तीची आख्यायिका सांगितली जाते. दहा तोंडी रावण पाषाणातील मूर्तीची गावातीलच एक पुजारी दररोज पूजा करतो, पण दसऱ्याला संपूर्ण गाव रावणाची पूजा करायला एकत्र येतं. महादेवाची पूजा करणारा रावण हा दृष्ट प्रवृत्तीचा नव्हता असं गावकऱ्यांचा मत आहे. पूर्वापार चालत आलेली आणि पूर्वजांनी सांगितल्या प्रमाणे आजही या गावात रावणाची पूजा केली जाते आणि ही परंपरा निरंतर सुरूच राहील असा विश्वास गावकऱ्यांना आहे.
advertisement
रावणाला पुजणारी फक्त सांगोळ्याची गावकरी मंडळी नाही, तर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकही रावणाचं दर्शन घ्यायला येतात. रावणाच्या दर्शनाने त्यांचे अनेक मार्ग सुखकर झाल्याचा अनुभव ते सांगतात. 'राम' आणि 'रावण' या दोन विचार धारांमध्ये अडकून सांगोळा या गावातील रावणाचं मंदिर येथे बनू शकलं नाही, मात्र गावकऱ्यांना आलेल्या अनुभवाने येथे सभा मंडप तयार करण्याचा गावकऱ्यांचा मानस आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dasara 2023 : महाराष्ट्रातलं असं हे गाव जिथे होते रावणाची पूजा, काय आहे नेमकं कारण?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement