डेडबॉडीवर ना खुणा, ना घटनास्थळी कोणते निशाण, गणेशसोबत काय घडलं? छ.संभाजीनगरमध्ये हत्येचं गुढ वाढलं
- Published by:Sachin S
Last Updated:
छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील हदियाबाद-नारवाडी परिसरात ही घटना घडली आहे.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच गंगापूर तालुक्यामध्ये एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या तरुणाच्या मृतदेहावर कोणत्याही मारण्याच्या खुणा नाही आणि शस्त्राचे वारही नाही, त्यामुळे पोलिसांसमोर मारेकरी शोधण्याचं आव्हानं उभं ठाकलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील हदियाबाद-नारवाडी परिसरात ही घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पुलाखाली एका युवकाचा मृतदेह आढळून आला.
advertisement
स्थानिक नागरिकांना हा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळल्यानं त्यांनी लगेच याची माहिती गंगापूर पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला आणि पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर इथं पाठवला.
मृताची ओळख पटली
पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवली आहे. मृत युवकाची ओळख गणेश रघुनाथ टेमकर (वय ३०, रा. भालगाव) अशी आहे. प्राथमिक तपासात मृतदेहाजवळ कोणतेही संघर्षाचे ठसे नाही. तसंच कोणत्या वाहनाने धडक दिली असावी असाही अंदाज बांधला. पण कोणत्याही वाहन अपघाताचे स्पष्ट चिन्हं घटनास्थळी आढळली नाहीत. तसंच, मृतदेहावर कोणत्याही शस्त्राने वार केल्याच्या खुणाही नाही. त्यामुळे घातपात की अपघात याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
advertisement
त्यामुळे गणेश टेमकर या तरुणासोबत नेमकं काय घडलं? याचा शोध लावण्याचे मोठा यक्ष प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिकांमध्ये अनेक चर्चा रंगल्या आहेत. गंगापूर पोलिसांनी शवविच्छेदनाचा अहवाल येईपर्यंत काहीही सांगणे शक्य नसल्याचं गंगापूर पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास गंगापूर पोलीस करत आहे.
view commentsLocation :
Gangapur,Aurangabad,Maharashtra
First Published :
November 14, 2025 9:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
डेडबॉडीवर ना खुणा, ना घटनास्थळी कोणते निशाण, गणेशसोबत काय घडलं? छ.संभाजीनगरमध्ये हत्येचं गुढ वाढलं


