मोठी बातमी! दीपक बोऱ्हाडे यांनी उपोषण सोडलं, धनगर समाजाच्या बैठकीनंतर निर्णय
- Published by:Prachi Amale
Last Updated:
उपोषण सोडण्याआधी बो-हाडे यांनी त्यांच्या शिष्टमंडळाची बैठक घेतली आणि बैठकीत उपोषण सोडण्यासाठीचा निर्णय झाला.
रवी जैस्वाल, प्रतिनिधी
जालना: धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी दीपक बोऱ्हाडे हे जालना येथे आमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे. मात्र आता दीपक बोऱ्हाडे यांनी उपोषण सोडलं आहे. 16 दिवस आमरण उपोषण केल्याने दीपक बोऱ्हाडे यांची प्रकृती खालावली होती. समाज बांधवांच्या विनंतीनंतर मुलीच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं आहे.
advertisement
जालन्यात सुरु असलेलं धनगर समाजाचे दिपक बो-हाडे यांचं उपोषण स्थगित करण्यात आलंय. मुलीच्या हस्ते ज्युस पिऊन दिपक बो-हाडे यांनी उपोषण सोडलंय. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून दिपक बो-हाडे 16 दिवसांपासून जालन्यात उपोषणाला बसले होते. त्यांनी आज उपोषण सोडलंय. उपोषण सोडण्याआधी बो-हाडे यांनी त्यांच्या शिष्टमंडळाची बैठक घेतली आणि बैठकीत उपोषण सोडण्यासाठीचा निर्णय झाला.
advertisement
बोराडे यांनी उपोषण मागे घेतले
सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे. हा लढा टिकला पाहिजे, सरकारकडून आम्ही आशावादी आहोत.. उपोषण सोडल्यानंतर राज्यभरात दौरा करणार असून गाव खेड्यातला धनगर एकत्र आणणार आहे.. त्यामुळं मुंबईत प्रश्न सुटला नाही तर दिल्लीला जाऊ, असा इशारा यावेळी दिपक बो-हाडे यांनी सरकारला दिला आहे. आधी सरकारच्या शिष्टमंडळाने दीपक बोऱ्हाडे यांची भेट घेतली होती. मंत्री पंकजा मुंडे, गिरीश महाजन, आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. त्यावेळी महाजन यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली होती, मात्र बोराडे यांनी उपोषण मागे घेतले नव्हते.
advertisement
आगामी काळात मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या त्यांच्या मागणीचं काय झालं असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता दीपक बोराडे हे उपचार घेणार आहेत. दीपक बोराडे हे उपचार घेऊन प्रकृती सुधारल्यानंतर सरकारसोबत मागण्यांच्या संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता आगामी काळात हा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
October 02, 2025 6:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोठी बातमी! दीपक बोऱ्हाडे यांनी उपोषण सोडलं, धनगर समाजाच्या बैठकीनंतर निर्णय