Delhi Police: दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर भरती, पात्रता काय ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Last Updated:

SSC Delhi Police Constable Bharti 2025 : दिल्ली पोलिस कॉन्स्टेबल भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) च्या माध्यमातून दिल्ली पोलिस कॉन्स्टेबलची भरती केली जाते.

SSC Delhi Police Constable Bharti 2025 : दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर भरती, पात्रता काय ? जाणून घ्या संपूर्ण माहिती
SSC Delhi Police Constable Bharti 2025 : दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर भरती, पात्रता काय ? जाणून घ्या संपूर्ण माहिती
दिल्ली पोलिस कॉन्स्टेबल भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) च्या माध्यमातून दिल्ली पोलिस कॉन्स्टेबलची भरती केली जाते. 7565 रिक्त पदांसाठी दिल्ली पोलिस दलामध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पोलिस दलातील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 22 सप्टेंबरपासून सुरू झाली असून 21 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. ऑनलाईन अर्जासोबतच शुल्क जमा करण्याचीही शेवटची तारीख 22 ऑक्टोबर आहे.
दरम्यान, अर्जदारांना जर त्यांच्या अर्जामध्ये काही सुधारणा करायची असेल, त्यासाठीही मुदत देण्यात आली आहे. 29 ते 31 ऑक्टोबर 2025 या काळामध्ये, अर्जदार फॉर्ममध्ये सुधारणा करू शकता. शिवाय परीक्षेची संभाव्य तारीखही देण्यात आली आहे. डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 मध्ये दिल्ली पोलिस कॉन्स्टेबलसाठी परीक्षा होण्याची शक्यता आहे. जाहिरातीमध्ये परीक्षेची तारीख नमूद करण्यात आली. ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी अर्जदारांनी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज शुल्कासह इतर सर्व माहिती जाहिरात PDF च्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे.
advertisement
भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, अर्जदार मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10वी आणि 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पुरुष उमेदवारांकडे PE & MT च्या वेळेपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स (कार किंवा मोटरसायकल) असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 25 वर्षे असणे आवश्यक आहे, म्हणजेच अर्जदाराचा जन्म 2 जुलै 2000 च्या पूर्वी किंवा 1 जुलै 2007 नंतर झालेला नसावा. दरम्यान, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयात सूट दिली जाईल. वयाची गणना 1 जुलैपासून केली जाईल.
advertisement
अनुसूचित जाती आणि जमातीतील उमेदवारांना 5 वर्षांची सूट आणि इतर मागासवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सूट दिली जाणार आहे. कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह) पुरुष पदासाठी 4408 जागा, कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM (Others) पदांसाठी 285 जागा, कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM Commando) पदांसाठी 376 जागा आणि कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह) महिला पदांसाठी 2496 जागांसाठी भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतात केली जात आहे.
advertisement
अर्ज कसा करावा
  • अर्ज भरण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर जा.
  • वेबसाइटच्या होम पेजवरील अप्लाय लिंकवर क्लिक करा आणि नंतर भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
  • येथे नवीन वापरकर्ता प्रथम? आता नोंदणी करा लिंकवर क्लिक करा आणि आवश्यक माहिती प्रविष्ट करून नोंदणी करा.
  • यानंतर, लॉगिनद्वारे इतर तपशील भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
  • शेवटी, विहित अर्ज शुल्क भरल्यानंतर, पूर्णपणे भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्या आणि ती सुरक्षित ठेवा.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Delhi Police: दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर भरती, पात्रता काय ? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement