त्यांचा व्होट जिहाद, आपण धर्मयुद्ध करा, देव-देश-धर्म काय असतो दाखवून द्या : देवेंद्र फडणवीस

Last Updated:

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा संपन्न झाली.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
छत्रपती संभाजीनगर : ज्यांचे मनसुबे रझाकारांचे राज्य आणण्याचे आहे, त्यांना मी सांगतो, आता आम्ही जागे झालो आहो. ही निवडणूक आपली एकजूट दाखविण्याची आहे. ते व्होट जिहाद करतायेत, आपण धर्मयुद्ध करू. देव देश धर्म काय आहे असतो हे संभाजीनगरकरांनी दाखवून द्यायला हवे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा संपन्न झाली. या सभेत हिंदु मतांच्या ध्रुवीकरण कसे होईल यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोर धरला. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओसेवी यांच्यावर हल्ला चढवला. तर बटेंगे तो कटेंगे म्हणत हिंदू समाजाला एकत्र राहण्याचे सांगताना महायुतीला ताकद देण्याचे आवाहन केले.
advertisement
सुन लो ओवेसी......
सुन लो ओवेसी छत्रपती संभाजीनगर..... औरंगाबाद नहीं... ज्या शहरात औरंगजेबाचे थडगे आहे, त्याचे नाव शहरालाच असूच शकत नाही, असे सांगताना कुणाचा बापही आला तरी आता छत्रपती संभाजीनगर हे नाव बदलू शकत नाही, असे आव्हान फडणवीस यांनी दिले.
लोकसभेला वोट जिहाद झाला, आता आपण धर्मयुद्ध करा
लोकसभा निवडणुकीत १० मतदारसंघात वोट जिहाद झाला. म्हणूनच आपल्या जागा कमी झाल्या. आपणही गाफील राहिलो. पण आता विधानसभा निवडणूक आपली एकजूट दाखविण्याची आहे. आता भगव्याचा एकत्रित हुंकार दिसला पाहिजे. म्हणून आपण 'बटेंगे तो कटेंगे, एक रहे तो साथ रहेंगे' अला नारा दिला आहे. ते व्होट जिहाद करतायेत, आपण धर्मयुद्ध करू. देव देश धर्म काय आहे असतो हे संभाजीनगरकरांनी दाखवून द्या, असे फडणवीस म्हणाले.
advertisement
फडणवीसांच्या टार्गेटवर ठाकरे
काही लोकांनी लाचारी सुरू केली आहे. काही नेत्यांवर आता हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नाही तर जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणायची वेळ आली आहे. म्हणूनच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्रित आलेल्या महायुतीला निवडून द्या, असा सणसणीत टोला फडणवीस यांनी ठाकरेंना लगावला.
येणाऱ्या तीन महिन्यात संभाजीनगर पाणीदार
महाविकास आघडी सरकारने संभाजीनगर मनपाला पैसे दिले नाही म्हणून पाण्याचे काम थांबले. पण आपले सरकार आले आणि काम चालू करून मनपाकडून एक रुपया सुद्धा घेतला नाही. येणाऱ्या तीन महिन्यात संभाजीनगर पाणीदार होणार आहे, असे फडणवीस म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
त्यांचा व्होट जिहाद, आपण धर्मयुद्ध करा, देव-देश-धर्म काय असतो दाखवून द्या : देवेंद्र फडणवीस
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement