Dhananjay Munde Health: हातापायांना कंप, थरथरणारे ओठ, शब्दही नीट फुटेना; धनंजय मुंडेंच्या प्रकृतीचा चिंतेत टाकणारा Video
- Published by:Prachi Amale
Last Updated:
धनंजय मुंडे यांना बोलताना त्रास होत असून त्यांचो ओठ थरथर कापत असल्याचे व्हिडीओमधून समोर आले आहे.
बीड : मस्साजोग येथील सरपंच हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराडमुळे गोत्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा तसेच प्रकृतीमुळे धनंजय मुंडे हे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत. आज बऱ्याच दिवसांनतर धनंजय मुंडे आज माध्यमांसमोर आले.बीडमधील मारहाण झालेल्या शिवराज दिवटे याची भेट घेत प्रकृतीची चौकशी त्यानंतर ते माध्यामांसमोर आले. माध्यमांशी बोलताना त्यांचे ओठ थरथरत होते, त्यामुळे अद्यापही धनंजय मुंडेंची प्रकृती पूर्णपणे बरी नसल्याचे व्हिडीओतून समोर आले.
गेली काही महिने धनंजय मुडे विधिमंडळाच्या अधिवेशनात दिसले नाही, ना अजित पवारांच्या बीड दौऱ्याला दिसले. ते बीडच्या नारळी सप्ताहात दिसले नाही. त्यामुळे धनंजय मुंडेच्या गैरहजरीच्या चर्चा कायमच रंगलेल्या पाहायला मिळतात. मात्र आज प्रकृती पूर्णपणे बरी नसली तरी धनंजय मुंडे शिवराज दिवटेच्या भेटीसाठी गेले. भेटीनंतर धनंजय मुंडे म्हणाले, दिवटे हे आमच्या कुटुंबातील सदस्यासारखा आहे.या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला आहे तसेच पोलिस अधिक्षकांनी देखील स्टेटमेंट दिले आहे की या प्रकरणात जातीपातीचे कारण नाही..आता या सर्व प्रकरणाचा तपास पोलिस नक्की करतील.
advertisement
धनजंय मुंडे पूर्णपणे बरे झालेले नाहीत
धनंजय मुंडे हे महाराष्ट्र सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा विभाग सांभाळत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते. तेव्हापासून धनंजय मुंडे हे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत. त्यामुळे नेहमीच वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. धनंजय मुंडेंनी स्वत: ट्वीट करत आजाराविषयी माहिती दिली होती. मात्र अजूनही धनजंय मुंडे पूर्णपणे बरे झालेले नाहीत.
advertisement
Watch Video:
Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांनी शिवराज दिवटे याची भेट घेत केली प्रकृतीची चौकशी pic.twitter.com/LHUST4elcr
— News18Lokmat (@News18lokmat) May 18, 2025
आजाराविषयी काय म्हणाले होते धनंजय मुंडे?
मला बेल्स पाल्सी हा आजार दीड महिन्यांपूर्वी झालेला असून त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो. बेल्स पाल्सी तसेच इतर काही वैद्यकीय बाबींचा त्रास अजूनही होतो असून बोलायला त्रास आहे, असे धनंजय मुंडे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 18, 2025 7:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dhananjay Munde Health: हातापायांना कंप, थरथरणारे ओठ, शब्दही नीट फुटेना; धनंजय मुंडेंच्या प्रकृतीचा चिंतेत टाकणारा Video









