ऐन थंडीत धाराशिवचं वातावरण तापलं, राणा जगजितसिंह आणि ओमराजे भिडले; आरोप-प्रत्यारोपांना उधाण

Last Updated:

राणा जगजितसिंह आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातील राजकीय वैर केवळ धाराशिवच नाही तर राज्यभरात चर्चेत असते.

News18
News18
धाराशिव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये ऐन थंडीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यांनी केलेल्या टीकेला खासदार ओमराजे निंबाळकरांनी प्रत्युत्तर देताना बोचरी टीका केली आहे. राणा जगजितसिंह आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातील राजकीय वैर केवळ धाराशिवच नाही तर राज्यभरात चर्चेत असते.
सध्या निवडणुकीच्या निमित्तानं या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच एका सभेत बोलताना राणा जगजितसिंह पाटील यांनी ओमराजे निंबाळकरांवर जोरदार हल्लाबोल केला होता.मी बारा गावचा पाटील आहे असं म्हणत राणा पाटील यांनी ओमराजे यांच्यावर टीका केली होती. राणा जगजितसिंह यांच्या या टीकेवर ओमराजे निंबाळकरांनी बोचऱ्या शब्दात पलटवार केलाय. राणा जगजितसिंह यांचा समाचार घेत असतानच ओमराजे निंबाळकरांनी त्यांचा लेक मल्हार पाटीलवरही निशाणा साधला आहे. मल्हार पाटील यांनी एका सभेत शिवसेना ठाकरे पक्षाच्या मशाल या निशाणीचा आईस्क्रिमचा कोन अशा शब्दात हेटाळणी केली होती,  त्यावर ओमराजेंनी हल्ला चढवला आहे.
advertisement

जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघालं

धाराशिवच्या राजकारणात निंबाळकर आणि पाटील कुटुंबात पिढ्यान् पिढ्या राजकीय आणि कौटुंबिक वाद धुमसत आहे. सध्या निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जहरी टीका केली जाते आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघालंय..

निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय 23 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर आल्याने 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदांच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार नाही. सुधारित कार्यक्रमानुसार 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आता उर्वरित 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होईल. त्यातील 76 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील न्यायालयीन प्रकरणांमुळे बाधित 154 जागांसाठीदेखील मतदान होणार नाही
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ऐन थंडीत धाराशिवचं वातावरण तापलं, राणा जगजितसिंह आणि ओमराजे भिडले; आरोप-प्रत्यारोपांना उधाण
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement