'बिनविरोध फेम' भाजपच्या मंत्र्याला पराभवाचा धक्का, NCP कार्यकर्त्यांनी गुलालासह नोटा उधळल्या, VIDEO
- Published by:Sachin S
Last Updated:
शिंदखेडा हा मंत्री जयकुमार रावल यांचा बालेकिल्ला मानला जातो. राज्यातली पहिली बिनविरोध दोंडाईचा नगरपालिका निवडून देणाऱ्या
धुळे: राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. अनेक ठिकाणी निकालाचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. उमेदवार विजयी झाल्यानंतर गुलाल उधळला जात आहे. असं असताना धुळ्यात चक्क राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नोटा उधळल्या आहे. या जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
धुळ्यातील शिंदखेडा नगरपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे. धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत राज्याचे पणन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारभाऊ रावल यांना जोरदार धक्का बसला आहे. शिंदखेडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कलावती माळी नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. तर भाजपच्या रजनी वानखडे यांचा पराभव झाला आहे. शिंदखेडा हा मंत्री जयकुमार रावल यांचा बालेकिल्ला मानला जातो. राज्यातली पहिली बिनविरोध दोंडाईचा नगरपालिका निवडून देणाऱ्या मंत्री जयकुमार रावलांना धक्का बसला आहे.
advertisement
पालकमंत्र्यांना धक्का दिल्यामुळे नगराध्यक्षपदाच्या विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
विजयी झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलालासोबत नोटा सुद्धा उधळल्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार कलावती माळी यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा हा जल्लोष सर्वत्र व्हायरल झाला आहे.
view commentsLocation :
Dhule,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 12:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'बिनविरोध फेम' भाजपच्या मंत्र्याला पराभवाचा धक्का, NCP कार्यकर्त्यांनी गुलालासह नोटा उधळल्या, VIDEO










