मराठी भाषिक आणि भूमिपुत्रांसाठी काम करणाऱ्या संघटनेची स्थापना, BMC निवडणुकीआधी एकनाथ शिंदे यांचं मोठं पाऊल
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून स्थानिय लोकाधिकार सेना महासंघ स्थापन करण्यात येतोय. याचा सर्वाधिक फायदा येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पक्षाला होऊ शकतो.
मुंबई : शिवसेना पक्षाच्या अंगिकृत स्थानिक लोकाधिकार सेना महासंघाची आज स्थापना होतेय. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकाधिकार स्थापना होतेय. शिवसेना पक्ष वाढविताना विविध संघटनांना एकत्र करून पक्षाची पाळेमुळे आणखी घट्ट करण्याचा प्रयत्न शिंदे यांचा आहे. महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदे यांनी स्थानिक लोकाधिकार सेनेची स्थापना केली आहे.
मुंबईत आज मातोश्री बिर्ला सभागृहात होत असलेल्या सोहळ्यात शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते थोड्याच वेळात याची घोषणा होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आनंदराव अडसूळ, रामदास कदम, गजानन कीर्तीकर, श्रीकांत शिंदे आदी नेते उपस्थित असतील.
मुंबई महापालिका निवडणुकीआधी एकनाथ शिंदे यांचं मोठं पाऊल
advertisement
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष बळकट करताना सरकारी आणि बिगर सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांना एकत्र करून स्थानिय लोकाधिकार महासंघ स्थापन करून कामगारांच्या आवाजाला मोठे व्यासपीठ मिळवून दिले होते. याच धर्तीवर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडूनही स्थानिय लोकाधिकार सेना महासंघ स्थापन करण्यात येतोय. याचा सर्वाधिक फायदा येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पक्षाला होऊ शकतो.विविध समाज, जाती किंवा व्यवसाय निहाय पंचवीस ते तीस सेल शिवसेनेमध्ये स्थापन केले जातील. विशेष म्हणजे, मराठी भाषिक आणि भूमिपुत्रांसाठी काम करणारी स्थानिक लोकाधिकार समिती पुन्हा एकदा कार्यान्वित केली जाईल. विशेष म्हणजे स्थानिय लोकाधिकार समिती ही मराठी भाषिक आणि भूमिपुत्रांसाठी काम करणार आहे.
advertisement
यावेळी स्थानिक लोकाधिकार सेना महासंघाच्या अध्यक्षपदी जेष्ठ शिवसेना नेते, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांची तर कार्याध्यक्ष पदावर शिवसेना लोकसभा गट नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
बाळासाहेबांनी स्थानिय लोकाधिकार महासंघाची स्थापना केली होती
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात असलेल्या विमा, तेल कंपन्या, विमान वाहतूक संघटना, रेल्वे संघटना, परिवहन संघटना, संशोधन आणि केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांच्या कार्यालयांमध्ये स्थानिय लोकाधिकार समिती सक्रीय करून कामगारांच्या आवाज ऐरणीवर आणला. भूमिपुत्रांच्या हक्कासाठी स्थानीय लोकाधिकार समितीने काम केले.संघर्ष करून न्याय मिळवून दिला. जीवाला जीव देणारे कार्यकर्ते या समितीने जोडले. शिस्तबद्ध पद्धतीने काम करणारी संघटना म्हणून स्थानीय लोकाधिकार समितीची ओळख आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 09, 2025 7:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मराठी भाषिक आणि भूमिपुत्रांसाठी काम करणाऱ्या संघटनेची स्थापना, BMC निवडणुकीआधी एकनाथ शिंदे यांचं मोठं पाऊल