Election Voting Ink : बोटावरची शाही पुसली तरी 'दुबार मतदान' नाही, आधीच तयार होता 'प्लॅन बी', निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा!

Last Updated:

Election Commission On Voting Ink : राज्यातील अनेक भागात शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणं शक्य नाही, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

Election Commission On Voting Ink Removal
Election Commission On Voting Ink Removal
Election Commission On Voting Ink Removal : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मतदारांच्या बोटावर लावली जाणारी शाई (मार्कर) सॅनिटायझरने सहज पुसली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. "हा निवडणुका जिंकण्यासाठी केलेला फ्रॉड आहे," असा गंभीर आरोप केला गेला. मार्करच्या खुणा पुसल्या जात असल्याने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना आता निवडणूक आयोगाने यावर उत्तर दिलंय.

कायदेशीर कार्यवाही केली जाईल

बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचं आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने दिलं आहे. बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
advertisement

मार्कर पेनचा वापर केला

मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही. याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्व संबंधिताना देण्यात आल्या आहेत. मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने 19 नोव्हेंबर 2011 रोजी आणि 28 नोव्हेंबर 2011 रोजी आदेश निर्गमित केले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जात आहे.
advertisement

गैरकृत्य करू नये

दरम्यान, या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल, अशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावण्यात यावी. तसेच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजुला त्वचेवर तीन- चार वेळा घासून शाई लावावी, अशा सूचना यापूर्वीदेखील देण्यात आल्या असून आणि त्या मार्कर पेनवरही नमूद केल्या आहेत. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचे गैरकृत्य करू नये, असं आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Election Voting Ink : बोटावरची शाही पुसली तरी 'दुबार मतदान' नाही, आधीच तयार होता 'प्लॅन बी', निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा!
Next Article
advertisement
BMC Election: EVM बिघाड, मार्करच्या शाईपेक्षा मोठा गोंधळ, मुंबईतले मतदार संतापले, नेमकं घडलंय काय?
EVM बिघाड, मार्करच्या शाईपेक्षा मोठा गोंधळ, मुंबईतले मतदार संतापले, नेमकं घडलंय
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदारांचा उत्साह

  • या निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित

  • ईव्हीएम आणि मतदान केल्याच्या शाई पेक्षा मोठा घोळ

View All
advertisement