मोठी बातमी : बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही मतदार याद्यांची फेरतपासणी होणार!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Election commission of India: भारत निवडणूक आयोगाने (ECI) देशव्यापी सखोल पुनरावलोकन मोहिमेच्या (SIR) तयारीचे मूल्यमापन करण्यासाठी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची (CEO) परिषद आयोजित केली.
मुंबई : बिहारमध्ये वादग्रस्त ठरलेल्या मतदार याद्यांच्या फेरतपासणीचा मुद्दा महाराष्ट्रातही डोकाविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही मतदार याद्यांची फेरतपासणी होणार असल्याचे वृत्त आहे. देशभरातील मतदार याद्यांची फेरतपासणी करण्याच्या तयारीत निवडणूक आयोग आहे.
भारत निवडणूक आयोगाने (ECI) देशव्यापी सखोल पुनरावलोकन मोहिमेच्या (SIR) तयारीचे मूल्यमापन करण्यासाठी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची (CEO) परिषद आयोजित केली. ही परिषद नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमॉक्रसी अँड इलेक्टोरल मॅनेजमेंट (IIIDEM) येथे घेण्यात आली. या परिषदेचे उद्घाटन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीरसिंग संधू व डॉ. विवेक जोशी उपस्थित होते. आयोगाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयांच्या SIR तयारीचे सविस्तर परीक्षण केले.
advertisement
महापालिका-स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांची फेरतपासणी
सर्व राज्यातील निवडणूक आयुक्तांची परिषद नवी दिल्लीत झाली. देशभरातील मतदारयांद्याचा फेर तपासणीचा आढावा भारतीय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला. महाराष्ट्रात महापालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांची फेरतपासणी होण्याची शक्यता आहे.
परिषदेत बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी त्यांचे अनुभव, धोरणे, अडचणी आणि सर्वोत्तम पद्धती याविषयी सादरीकरण केले, जेणेकरून इतर राज्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल. सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रातील मतदारसंख्या, शेवटच्या SIR ची पात्रता दिनांक, तसेच मतदार यादीतील माहिती सादर केली. याशिवाय, मागील SIR नंतर झालेल्या मतदार याद्यांचे डिजिटायझेशन व वेबसाइटवर अपलोड स्थितीही मांडण्यात आली.
advertisement
त्याचप्रमाणे, विद्यमान मतदारांची शेवटच्या SIR मधील मतदारांशी जुळवणी कितपत झाली आहे, याची माहिती देण्यात आली. प्रत्येक मतदान केंद्रावर जास्तीत जास्त १,२०० मतदार असावेत, याकरिता मतदार केंद्रांच्या सुसूत्रीकरणाचा आढावा घेण्यात आला. मतदार यादीत कोणताही पात्र नागरिक वगळला जाणार नाही व अपात्र नागरिकाचा समावेश होणार नाही, यासाठी आवश्यक कागदपत्रांची शिफारसही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली. या कागदपत्रांच्या सादरीकरणात नागरिकांना सोयीचे व्हावे, यावर विशेष भर देण्यात आला.
advertisement
याशिवाय, जिल्हा निवडणूक अधिकारी (DEO), EROs, AEROs, BLOs आणि BLAs यांच्या नियुक्ती व प्रशिक्षणाची स्थितीही आयोगाने तपासली असल्याचे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 9:51 PM IST