Amravati: घरात घुसून महिला पोलीस कर्मचाऱ्याची गळा दाबून हत्या, अमरावती पोलीस दलात खळबळ
- Published by:Sachin S
- Reported by:SANJAY SHENDE
Last Updated:
आशा घुले यांचे पती देखील राज्य राखीव पोलीस दल अर्थात एसआरपीएफमध्ये कर्मचारी आहे. हत्या झालेल्या आशा घुले या पोलीस कॉन्स्टेबल म्हणून फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या.
अमरावती: अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावती पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरात गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचीच हत्या झाल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहराच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुकृपा कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे. आसा तायडे-घुले (वय ३८) असं हत्या झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. आशा तायडे या गुरुकृपा कॉलनीमध्ये आपल्या पतीसह राहत होत्या. आशा घुले यांचे पती देखील राज्य राखीव पोलीस दल अर्थात एसआरपीएफमध्ये कर्मचारी आहे. हत्या झालेल्या आशा घुले या पोलीस कॉन्स्टेबल म्हणून फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या.
advertisement
शुक्रवारी संध्याकाळी अज्ञात व्यक्तीने घरात घुसून आशा तायडे यांची गळा दाबून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि डीसीपी गणेश शिंदे सह पोलीस वरिष्ठ पोलीस दाखल झाले. घराची पाहणी करून पंचनामा करण्यात आला आहे.
advertisement
आशा तायडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. एका पोलीस कर्मचारी महिलेची राहत्या घरात घुसून कुणी हत्या केली, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहे. मात्र, महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येचं कारण अद्याप कळू शकलं नाही. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.
view commentsLocation :
Amravati,Maharashtra
First Published :
August 01, 2025 11:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amravati: घरात घुसून महिला पोलीस कर्मचाऱ्याची गळा दाबून हत्या, अमरावती पोलीस दलात खळबळ


