Subhash Zambad : काँग्रेसच्या माजी आमदाराला अटक, अजिंठा बॅक गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई

Last Updated:

अजिंठा बँक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झाबंड यांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता. आज त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

subhash zambad arrested
subhash zambad arrested
Subhash Zambad, Ajanta Urban Bank Fraud Case : अविनाश कानडजे, छत्रपती संभाजीनगर : अजिंठा बँक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता. आज त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. 21 जानेवारी रोजी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता तेव्हापासूनच अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आज अखेर सुभाष झांबड यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड अझिंठा अर्बन बॅँकेचे अध्यक्ष असून बॅकेमधील 98 कोटी 48 लाख व 21 कोटी रूपयाच्या घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर सीटीचौक पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. पहिला गुन्हा हा ऑक्टोबर 2023 मध्ये दाखल असून दुसरा गुन्हा हा नोव्हेंबर 2024 मध्ये नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून सुभाष झांबड अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न करत आहेत. यापुर्वी जिल्हा व सत्र न्यायालय आणि औरंगबाद खंडपीठात झांबड यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर झांबड यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथे त्याच्या अर्जाच्या सुनावणीच्या वेळी झांबड पोलिसांसमोर हजर झाले आणि पुन्हा जामीनासाठी अर्ज केल्यास त्यावर न्यायालयाने तत्काळ निर्णय घ्यावा,असे आदेश देण्यात आले आहेत.
advertisement
दरम्यान पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून सुभाष झांबड अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न करत आहेत. यापुर्वी जिल्हा व सत्र न्यायालय आणि औरंगबाद खंडपीठात झांबड यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळण्यात आला होता.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Subhash Zambad : काँग्रेसच्या माजी आमदाराला अटक, अजिंठा बॅक गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement