Gadchiroli News : भल्यापहाटे मुलीसमोरच पत्नीवर कऱ्हाडीने सपासप वार! नंतर जे केलं त्याने गाव हादरला

Last Updated:

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यात सीमेवरील बेतकाठी गाव खुनाच्या थरारक घटनेने हादरून गेले आहे.

News18
News18
गडचिरोली, (महेश तिवारी, प्रतिनिधी) : नवरा बायकोतील वाद आपल्याला नवीन नाही. मात्र, अनेकदा हा वाद विकोपाल्याने जीव घेण्यापर्यंतच्या गोष्टी घडत असतात. अशीच एक घटना गडचिरोली जिल्ह्यातून समोर आली आहे. कोरची तालुक्यापासून दहा किलोमीटर अंतरावरील छत्तीसगड सीमेवरील बेतकाठी गाव खुनाच्या थरारक घटनेने हादरून गेले आहे. आज पहाटे 3 वाजता पतीने भरझोपेत लहान मुलीसमोर पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. त्यानंतर निर्दयी पती रक्ताने माखलेली कुऱ्हाड हाती घेऊन गावात फिरनाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे
अमरोतीन रोहिदास बंजार (वय 33 असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती रोहिदास बिरसिंग बंजार (37) बेतकाठी गावात राहणारे हे जोडपे मोलमजुरी करायचे. पहाटे 3 वाजता पती रोहिदास याने पत्नीवर धारदार कुऱ्हाडीने हल्ला केला. यात ती जागीच ठार झाली. आठ वर्ष वयाच्या मुलीसमोर त्याने ही हत्या केली. त्यानंतर निर्दयी रोहिदास बंजार हाती कुऱ्हाड घेऊन बाजार चौकात गेला. रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत भल्या पहाटे फिरून काही वेळाने कुऱ्हाड पाण्याने धुवून घरामागे झुडुपात फेकून दिली. मोठ्या भावाने गावातील युवकांच्या मदतीने त्यास पकडून घरी खुर्चीत बसवले व खांबाला दोरीने बांधून ठेवले व नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.
advertisement
चार बहिणी प्रेमाला पारख्या
अमरोतीन व रोहिदास यांना चार मुली आहेत. आईची हत्या, वडील तुरुंगात गेल्याने या चार बहिणींचा आधार हरवला आहे. त्या आई-वडिलांच्या प्रेमाला पारख्या झाल्या आहेत. 15 वर्षांची माधुरी नववीत, 13 वर्षांची मनीषा सातवीत, 11 वर्षीय कौशल्या पाचवीत तर 8 वर्षांची वैशाली दुसरीत शिक्षण घेत आहे. या घटनेने चौघी बहिणींचं जीवन पालकांविना पोरक झालं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गडचिरोली/
Gadchiroli News : भल्यापहाटे मुलीसमोरच पत्नीवर कऱ्हाडीने सपासप वार! नंतर जे केलं त्याने गाव हादरला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement