Gauri Ganapati Shopping: गौरीच्या सजावटीसाठी साहित्य शोधताय? गिरगावात फक्त 40 रुपयांपासून पर्याय उपलब्ध

Last Updated:

Gauri Ganapati Shopping: गौरीगणपतीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याने बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. ग्राहक देखील मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी करत आहेत.

+
Gauri

Gauri Ganapati Shopping: गौरीच्या सजावटीसाठी साहित्य शोधताय? गिरगावात फक्त 40 रुपयांपासून पर्याय उपलब्ध

मुंबई : दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीपासून देशभरात गणेशोत्सवाला सुरुवात होते. यावर्षी 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. गणपतीच्या आगमनानंतर चार दिवसांनी गौरींचे आगमन होणार आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र गौरी-गणपतीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. गिरगावामध्ये देखील भक्तांमध्ये लगबग सुरू आहे. यासाठी गौरीचे मुखवटे, फायबरची बॉडी, हात-पाय, दागिने, कपडे ते गौरीचं बाळ, या साहित्यांनी बाजारपेठ फुलून गेली आहे. गिरगाव येथील 'सम्राट ड्रेसवाला' या जुन्या व प्रसिद्ध दुकानात गौरीचं साहित्य अतिशय स्वस्त दरात उपलब्ध आहे.
हे दुकान ग्रँट रोड स्टेशनपासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर असून, गेली अनेक वर्षे येथे गौरी गणपतीसाठी लागणारे सर्व साहित्य भक्तांना मिळत आहे. त्यामुळे अनेक घरगुती तसेच मंडळस्तरीय भाविक या दुकानाला पसंती देतात. दुकानदार सम्राट यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुकानात मिळणाऱ्या फायबरच्या वस्तूंवर एक वर्षाची हमी दिली जाते. त्यामुळे वापरादरम्यान तडे जाणे किंवा तुटणे याची भीती नसते. हे साहित्य अनेक वर्षे वापरता येतं.
advertisement
साहित्य आणि दर
गौरीचे मुखवटे: खळीचे, अमरावतीचे स्पेशल, चंद्रकोर किंवा टिकली असलेले अशा विविध प्रकारचे मुखवटे येथे 1500 पासून मिळत आहेत.
गौरीची फायबर बॉडी: झिरो-मेंटेनन्स तसेच स्क्रू-फिटिंग पर्यायात उपलब्ध असलेल्या या बॉडीवर स्वतः दागिने वापरता येतात. काही मॉडेल्समध्ये आधीच दागिने बसवलेले आहेत.
advertisement
गौरीचे हात-पाय: कापडी हात फक्त 200 पासून तर फायबरचे हात व पाय 350 ते 500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
गौरीचं बाळ: फायबर व कापडी स्वरूपात असलेली बाळं 200 रुपयांपासून मिळत आहेत.
दागिने: नेकलेस, ठुशी, चोकर, कोल्हापुरी साज, मोत्यांच्या माळा, बांगड्या, नथ इत्यादी दागिने फक्त 40 रुपयांपासून मिळत आहेत.
गौरीचे फेटे: विविध रंगसंगतीत, ₹300 पासून.
advertisement
गौरीगणपतीचा सण जवळ आल्याने सध्या दुकानात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. काही भक्त आपल्या आवडीचे मुखवटे व दागिने निवडताना तर काही सार्वजनिक मंडळं मोठ्या प्रमाणात होलसेल खरेदी करताना दिसतात. कमी दर, विविधता आणि टिकाऊपणा यामुळे गिरगावातील हे दुकान सध्या भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र बनलं आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Gauri Ganapati Shopping: गौरीच्या सजावटीसाठी साहित्य शोधताय? गिरगावात फक्त 40 रुपयांपासून पर्याय उपलब्ध
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement