Beed Crime: '500 रुपये द्या अजून', बीडच्या लाचखोर ग्रामसेवकाचा Video समोर; वरकमाईचा मोह आवरेना

Last Updated:

ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकतेचा अभाव आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचे उदाहरण आहे.

Beed Bribe
Beed Bribe
बीड : राज्यात गेल्या काही दिवसांत एसीबीच्या (ACB) म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईला वेग आला असून विविध जिल्ह्यात सरकारी अधिकारी, कर्मचारी जाळ्यात अडकत आहेत. काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये एका ग्रामसेवकाला लाच घेताना पकडले. त्यानंतर आता बीडमध्ये कागदपत्रासाठी एका ग्रामसेवकाने लाच घेतल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. नाळवडी ग्रामपंचायत कागदपत्रांसाठी अधिकाऱ्यांनी पैसे मागितल्याचे समोर आले आहे.
बीडच्या नाळवाडी ग्रामपंचायतीमध्ये कागदपत्रासाठी ग्रामस्थांकडून पैशाची मागणी केल्याचा ग्रामसेवकाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओत अधिकारी सरळ सरळ म्हणतो की, “पैसे उसने घ्या, पण आम्हाला द्या”, असा दबाव ग्रामस्थांवर आणण्यात आला. सदर घटना ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकतेचा अभाव आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचे उदाहरण आहे.

प्रशासकीय कामकाजाचा बुरखा फाडला

सरकारी पातळीवर निधी उपलब्ध असतानाही, गावकऱ्यांकडून व्यक्तिगत स्वरूपात पैसे मागितले जात असल्याचे उघड झाले आहे. संतप्त शेतकऱ्यांनी ग्रामसेवकाचा व्हिडिओ तयार केल्याने प्रशासकीय कामकाजाचा बुरखा फाडला आहे. पैसे घेणाऱ्या ग्रामसेवकाचे नाव शकील सय्यद असे आहे. दरम्यान ग्रामसेवकाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
advertisement

राज्यभरात खळबळ

दर आठवड्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होत असताना लाचखोरी थांबण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी-कर्मचारी लाचखोरीला आळा बसावा यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. परंतु लाचखोरी थांबायचं नाव घेत नाही. पोलीस, व प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या घटना सातत्याने समोर आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed Crime: '500 रुपये द्या अजून', बीडच्या लाचखोर ग्रामसेवकाचा Video समोर; वरकमाईचा मोह आवरेना
Next Article
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement