गोंदिया हादरलं! दळण टाकताना महिलेसोबत घडलं भयंकर, जागीच मृत्यू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात धडापासून डोकं वेगळे होऊन तेथील एका 46 वर्षीय महिलेचा करूण अंत झाला.
रवी सपाटे, प्रतिनिधी गोंदिया : दळण दळायला देत असताना महिलेची ओढणी चक्कीत अडकली आणि महिलेसोबत धक्कादायक घटना घडली आहे. गळ्यातील ओढणी आटा चक्कीच्या पट्ट्याला अडकून दुर्घटना घडली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात धडापासून डोकं वेगळे होऊन तेथील एका 46 वर्षीय महिलेचा करूण अंत झाला.
या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. ही दुर्देवी घटना नवेगावबांध येथील आझाद चौकातील हर्षल उजवणे यांच्या आटा चक्कीत घडली. नीतू हर्षल उजवणे असे मृतक महिलेचं नाव आहे. हर्षल उजवणे यांची आटा चक्की आहे. त्यांच्या पत्नी नीतू ह्या नेहमीप्रमाणे आटा चक्कीवर दळण दळत असताना ही दुर्घटना घडली.
नीतू यांच्या गळ्यातील ओढणी दळण टाकताना आटा चक्कीच्या पट्ट्याला अडकली असावी, त्यामुळे त्यांचे डोके आटा चक्कीच्या चाकाला अडकून ते धडापासून वेगळे झाले. त्यामुळे त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. भीषण अपघाताने गावात एकच खळबळ उडाली असून, उजवणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
नीतू यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. घटनेची माहिती मिळताच येथील पोलीस ठाण्याच्या ठाणेदार पोलीस निरीक्षक योगिता चाफले आपल्या सहका ऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून प्रेत उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे पाठविले आहे.
Location :
Gondiya,Gondiya,Maharashtra
First Published :
June 29, 2024 10:54 AM IST