Naxalite : वय 25, डोक्यावर 14 लाखांचे बक्षीस, 3 राज्यात वाँटेड असलेला नक्षलवादी अखेर बालाघाटमध्ये ठार

Last Updated:

Naxalite : गोंदिया जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या बालाघाट जिल्ह्यात हॉकफोर्स सोबतच्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला आहे.

3 राज्यात वाँटेड असलेला नक्षलवादी अखेर बालाघाटमध्ये ठार
3 राज्यात वाँटेड असलेला नक्षलवादी अखेर बालाघाटमध्ये ठार
गोंदिया, 30 सप्टेंबर (रवी सपाटे, प्रतिनिधी) : गोंदिया सीमेवर असलेल्या बालाघाट जिल्ह्यात हॉकफोर्स सोबत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार करण्यात बालाघाट पोलिसांना यश आले आहे. बक्षीस ठार झालेल्या नक्षलवाद्यावर तब्बल 14 लाखांचे होते, ही घटना बालाघाट जिल्ह्यातील रूपझर पोलीस ठाण्यांतर्गत कडला येथील जंगलात, कुंदल-कोद्दापार या ठिकाणी घडली. ठार झालेला नक्षली हा गोंदिया येथील तांडा दरेकसा दलममध्ये सक्रिय होता. बालाघाट पोलीस ठाण्यांतर्गत हे या वर्षातील तिसरे मोठे यश बालाघाट पोलिसांना मिळाले आहे.
काही दिवसांअगोदरच गोंदियात पती पत्नी नक्षल्यांनी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं. त्यामुळे मध्यप्रदेश पोलिसांच्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाल्याने जरी मध्यप्रदेशात चकमक झाली असली तरी गोंदियात खळबळ खडबळ उडाली असून गोंदिया जिल्हा पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत.
वाचा - जिच्यासाठी धर्मांतर केलं, तिचाच विषय संपवला; ठाण्यात विजय उर्फ समीरनं जे केलं...
25 वर्षीय मलाजखंड दलमचा नक्षलवादी कमलू हा हॉक फोर्ससोबत झालेल्या चकमकीत ठार झाला. ठार झालेला नक्षली गोंदिया येथील तांडा दरेकसा दलम मध्ये सक्रिय होता. कमलूवर तीन राज्य मिळून 14 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. हॉकफोर्सचे जवान जंगलात शोध मोहीम राबवित असताना त्यांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली हे सर्व नक्षलवादी मलाजखंड दलमचे सक्रिय सदस्य होते. या चकमकीत नक्षलवाद्यांनी जवानांवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हॉकफोर्सने केलेल्या गोळीबारात नक्षलवादी कमलू ठार झाला. बालाघाट जिल्ह्यातील रूपझर पोलीस ठाण्यांतर्गत कडला येथील जंगलात, कुंदल-कोद्दापार या ठिकाणी घडली. बालाघाट पोलीस ठाण्यांतर्ग हे या वर्षातील तिसरे मोठे यश आहे. या पूर्वी 22 एप्रिलला प्रत्येकी 14 लाख रुपये बक्षीस असलेल्या एक महिला नक्षलवादी क्षेत्र कमांडर टांडा दलमची सुनीता आणि टांडा दलममधील एरिया कमांडर आणि सध्या विस्तार दलममध्ये कार्यरत असलेल्या नक्षलवादी कबीरच्या गार्ड असलेल्या खटिया मोचा दलम मधील सरिता यांना ही चकमकीत ठार करण्यात आले होते. ठार झालेल्या नक्षलवाद्याकडून बंदुक, काडतुसे, मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांची शस्त्रे आणि खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गोंदिया/
Naxalite : वय 25, डोक्यावर 14 लाखांचे बक्षीस, 3 राज्यात वाँटेड असलेला नक्षलवादी अखेर बालाघाटमध्ये ठार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement