Gondia Crime : लग्न समारंभासाठी आलेल्या चिमुकलीचे अपहरण करून हत्या; गोंदिया हादरलं

Last Updated:

गोंदियामध्ये लग्न समारंभासाठी आलेल्या चिमुकलीचे अपहरण करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

News18
News18
गोंदिया, रवी सपाटे, प्रतिनिधी : गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. लग्न समारंभात आलेल्या एका बारा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. गावालगत असलेल्या जंगल परिसरामध्ये तिचा मृतदेह आढळून आला आहे. चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या क्षेत्रात ही घटना घडली आहे. चिमुकलीवर अत्याचार झाल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. दरम्यान घटनेबाबत अधिक तापस सुरू असल्याची माहिती चिचगड पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात असलेल्या एका गावात लग्न समारंभासाठी आलेल्या एका बारा वर्षांच्या चिमुकलीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. तिचे अपहरण करून नंतर हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्हा हादरला आहे. ही चिमुकली आपल्या बहिणीसोबत लग्नसमारंभासाठी या गावामध्ये आली होती. मात्र विवाहाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर अचानक ती बेपत्ता झाल्याचं लक्षात आलं. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती कुठेच आढळून आली नाही.
advertisement
त्यानंतर सकाळी पुन्हा एकदा शोधमोहीम राबवण्यात आली. गावालगत असलेल्या जंगल परिसरात तिचा शोध घेण्यात आला. समोरचं दृष्ट पाहून ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे. ही मुलगी जंगलामध्ये मृत अवस्थेमध्ये आढळून आली आहे. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  पोलिसांनी घटनास्थळाच्या परिस्थितीवरून मुलीवर अत्याचार झाल्याच्या संशय व्यक्त केला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गोंदिया/
Gondia Crime : लग्न समारंभासाठी आलेल्या चिमुकलीचे अपहरण करून हत्या; गोंदिया हादरलं
Next Article
advertisement
Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement