Gondia Crime News : गोंदियात मोठा शस्त्रसाठा जप्त; पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं अन्...
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
गोंदियामधून मोठी बातमी समोर येत आहे. पोलिसांनी शहरातून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.
गोंदिया, रवी सपाटे, प्रतिनिधी : गोंदियामधून मोठी बातमी समोर येत आहे. पोलिसांनी शहरातून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. देशी कट्टा, चार तलवारी आणि एका गुप्तीचा या शस्त्रांमध्ये समावेश आहे. लोकसभा निवडणूक आणि होळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शहरातील गौतमनगर, कुंभारेनगर आणि छोटा गोंदिया परिसरात राबवण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गोंदियामध्ये लोकसभा निवडणूक आणि होळीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांच्या वतीनं कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं आहे. गौतमनगर, कुंभारेनगर आणि छोटा गोंदिया परिसरात पोलिसांनी केम्बिंग ऑपरेशन राबवून रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घराची झडती घेतली. यात एक देशी कट्टा, चार तलवारी आणि एक गुप्ती जप्त करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यांच्या घराची झडती घेण्यात आली आहे, सोबतच अवैध दारूबंदी कायद्यांतर्गत देखील तीन कारवाया करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
Location :
Gondiya,Maharashtra
First Published :
March 25, 2024 9:42 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गोंदिया/
Gondia Crime News : गोंदियात मोठा शस्त्रसाठा जप्त; पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं अन्...


