Gopichand Padalkar On Uddhav Thackeray: 'उद्धव ठाकरे तर सूर्याजी पिसाळाची औलाद', भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची जहरी टीका
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Gopichand Padalkar On Uddhav Thackeray : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीकेचा बाण सोडत महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद पेटवला आहे.
असिफ मुरसळ, प्रतिनिधी, सांगली: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीकेचा बाण सोडत महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद पेटवला आहे. “उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहेत,” अशा शब्दांत त्यांनी थेट हल्लाबोल केला.
सांगलीतील जतमध्ये एका कार्यक्रमात भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत हे उपस्थित होते. त्यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, “2019 मध्ये महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला बहुमत दिलं होतं. मात्र मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक युती केली. हे वर्तन म्हणजे सूर्याजी पिसाळासारखं गद्दारपणच होतं, असं पडकळरांनी म्हटले.
पडळकर यांनी ठाकरेंवर टीकेचे बाण सोडताना म्हटले की, “सध्या मातोश्रीवर कोणीही भेटायला जात नाही. उद्धव ठाकरेंकडे कोणीच फिरकत नाही. त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे. ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. याच नैराश्यामुळे उद्धव ठाकरे कोणालाही काहीही बोलू लागले आहेत.”
advertisement
उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘अनाजीपंत’ अशी उपमा देत टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर पडळकर यांनी हा प्रतिहल्ला चढवला आहे. जत येथे एका स्थानिक कार्यक्रमात बोलताना पडळकरांनी ही आगपाखड केली. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून शिवसेना ठाकरे गटाकडून यावर प्रत्युत्तर येण्याची शक्यता आहे. राज्यात आगामी निवडणुकांचं वातावरण तापत असतानाच अशा प्रकारची टीका आणि पलटवारामुळे शिवसेना ठाकरे गट-भाजपमधील तणाव आणखी चिघळण्याची चिन्हं दिसत आहेत.
advertisement
वेंद्र फडणवीस यांनी पुण्याईचं काम केलं, सदाभाऊ खोतांचे वक्तव्य
दोन भाऊ एकत्र यावेत ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती इच्छा पूर्ण करून पुण्याचे काम केले आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस घर फोडत नाहीत, तर घर जोडतात. पण काही लोक घरात लई त्रास होतो म्हणून घर सोडतात,अशा शब्दात आमदार सदाभाऊ खोत यांनी राज आणि उद्धव ठाकरेंना खोचक टोला लागवला आहे
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
July 07, 2025 8:14 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Gopichand Padalkar On Uddhav Thackeray: 'उद्धव ठाकरे तर सूर्याजी पिसाळाची औलाद', भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची जहरी टीका