तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचं मी मंगळसूत्र चोरलं? जयंत पाटलांवर बोलताना पडळकरांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात रोष पाहायला मिळाला होता. आज पुन्हा एका सभेत बोलताना पडळकर यांनी जयंत पाटील यांना लक्ष्य केले.
असिफ मुरसल, प्रतिनिधी, सांगली : जयंत पाटील हा हिंदू विरोधी आहे. त्यामुळे आगामी काळात ईश्वरपूरच्या लोकांनी त्याला जागा दाखवावी. माझ्या डोक्यात जायची वाट बघू नका. डोक्यात जाण्याचा प्रयत्न कराल ती तुमच्यासाठी काळी अंधाराची रात्र असेल. मला मंगळसूत्र चोर बोलता, जयंत पाटलांच्या कोणत्या, किती नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र चोरले? असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.
गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात रोष पाहायला मिळाला होता. आज पुन्हा एका सभेत बोलताना पडळकर यांनी जयंत पाटील यांना लक्ष्य केले.
तेरी उमर जायेगी मुझे मिटाने में, जयंतरावांना इशारा
सध्या बरेच लोक माझ्या विरोधात भूमिका घेत आहे. मला त्यांना सांगायचे आहे की बडे से बडी हस्ती मिट गयी मुझे झुकाने मे, तू कोशीश भी मत करना, तेरी उमर जायेगी मुझे मिटाने में... अशा शायराना अंदाजात पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधात आहे. सांगलीत कर्मवीर भाऊराव पाटील, नागनाथ अण्णा नायकवाडी, अण्णाभाऊ साठे असे महापुरूष असताना कोणाचेही स्मारक का झाले नाही? एकच माणूस म्हणजे काय जिल्हा आहे काय? असे पडळकर म्हणाले. त्यांचा रोख दिवंगत नेते राजाराम बापू पाटील यांच्या स्मारकाकडे होता.
advertisement
मी सुभेदार मल्हारराव होळकर यांची औलाद
मी जे विषय मांडले त्याच्यावर जयंत पाटील यांनी चर्चा करावी. कारखाने ढापता, घोटाळे करता आणि मी त्यावर बोललो तर माझ्याशी लढण्यासाठी पोलीस, तलाठी, तहसीलदार यांना पुढे करता. मी सुभेदार मल्हारराव होळकर यांची औलाद आहे, असा इशारा त्यांनी दिला.
विशाल पाटील, विश्वजित कदम, जयंत पाटील हे एकत्र आले, माझ्यामुळे त्यांचातला वाद मिटला
advertisement
गेल्या आठवड्यात सांगलीत महाराष्ट्र संस्कृती सभा झाली. त्या सभेत मला आय बहिणीवर शिव्या दिल्या. मला गोप्या-गोप्या म्हणत होते. मी तुला जंत्या म्हटलं तर चालेल का? अरे त्या जयंत्याला चॅलेंज आहे,आणि त्यांच्या कुत्र्यांना.. जातीवंत पाटील असेल तर उद्या दुपारी पत्रकार परिषद घेऊन मला वेळ द्या. ईश्वरपूर की वाळव्यात कुठे यायचे ते त्यांनी वेळेसह सांगावे. मी त्याठिकाणी जायला तयार आहे. गोपीचंद घाबरणारा नाही. शेर पैदा होते है, बनाये जाते नही, असेही ते म्हणाले. तसेच विशाल पाटील, विश्वजित कदम, जयंत पाटील हे एकत्र आले. माझ्यामुळे त्यांचातला वाद मिटला, ही माझी ताकद आहे, असेही पडळकर म्हणाले.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
September 30, 2025 8:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचं मी मंगळसूत्र चोरलं? जयंत पाटलांवर बोलताना पडळकरांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य