उत्पादन शुल्क वाढलं पण पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार नाही, काय आहे नेमकं कारण?

Last Updated:

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेवरील उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. मात्र याचा सर्वसामान्यांना कोणताही फटका बसणार नाही.

News18
News18
नवी दिल्ली : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात दोन रुपयाची (एक्साईज ड्यूटी) वाढ केली आहे. मोदी सरकारने एप्रिल महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात इंधनाच्या एक्साईज ड्यूटीत वाढ केली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेवरील उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. मात्र याचा सर्वसामान्यांना कोणताही फटका बसणार नाही.
पेट्रोलच्या एक्साईज ड्यूटीत प्रति लिटर 13 रुपयांची, तर डिझेलवरील एक्साईज ड्यूटीत 11 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता आहे. ही दोन रुपयांची वाढ असून पेट्रोल डिझेलमध्ये वाढ होणार आहे. सरकारने महसूल वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे
यानंतर सर्वसामान्यांना पुन्हा एकदा इंधन दरवाढीची भीती नक्कीच लागून असेल, पण सरकारच्या या निर्णयाचा देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम होणार नाही. या निर्णयामुळे देशातील इंधनाच्या किमतीवर कोणताही परिणाम होणार नसला तरी या गोष्टींची उपलब्धता कायम राहील. पेट्रोल, डिझेलच्या दरात कुठलीही वाढ होणार नाही. पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ केल्याने त्याचा फायदा केंद्र सरकारला होणार आहे. यातून आलेला महसूल सरकारला पायभूत सुविधांवर खर्च करता येणार आहे.
advertisement
advertisement

नवीन नियम कधीपासून लागू होईल?

सरकारने सोमवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ केली. उत्पादन शुल्कात वाढ झाल्याने सर्वसामान्यांवर कोणताही अतिरिक्त बोजा पडणार नाही, ही दिलासादायक बाब आहे. जागतिक तेलाच्या किमतींमध्ये सतत होत असलेले चढउतार आणि ट्रम्प प्रशासनाकडून प्रतिशोधात्मक दरांची घोषणा करताना हा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर 8 एप्रिलपासून लागू होणार आहेत. सरकारकडून अधिकृत आदेश जारी करून ही माहिती देण्यात आली आहे.
advertisement

पेट्रोल डिझेल वाढणार?

सरकारकडून ही अधिसूचना जारी होताच पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. या वाढीचा बोजाही सर्वसामान्यांवर पडणार आहे. किरकोळ किमतींवर याचा काय परिणाम होईल हे आदेशात नमूद केलेले नाही. मात्र, नंतर परिस्थिती स्पष्ट झाली. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या ट्विटनुसार किरकोळ किमतीत बदल होण्याची शक्यता नाही.  कच्च्या तेलाची किंमत खूप कमी झाली आहे. एमसीएक्सवर 21एप्रिल 2025 च्या डिलिव्हरीचे कच्चे तेल 3.48 टक्क्यांनी घसरून 5126 रुपये झाले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उत्पादन शुल्क वाढलं पण पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार नाही, काय आहे नेमकं कारण?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement