नवीन घरात अचानक कपडे जळाले, हळद-कुंकू पडली, अघोरी कांड बघून कुटुंब हादरलं, नेमकं काय घडलं?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Hingoli: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका कुटुंबाच्या नवीन घरात भानामतीचा प्रकार उघडकीस आला आहे.
हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका कुटुंबाच्या नवीन घरात भानामतीचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित कुटुंबाने नवीन घर बांधलं होतं, पण घरात कुणीतरी पूजा मांडल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार केवळ एकदा घडला नाही. तर दोन दिवसांत तब्बल तीनवेळा असा प्रकार घडला आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर कुटुंब हादरून गेलं आहे. त्यांनी या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
कळमनुरी तालुक्यातील दाभडी येथील रहिवासी असलेले नवनाथ दिगंबर बोंढारे (वय २६) यांच्या गावातील राहत्या घरी आणि चुलत भावाच्या नवीन बांधकाम केलेल्या घरात २१ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता ते २३ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कोणी तरी अज्ञात व्यक्तीने भानामती करण्याच्या उद्देशाने पूजा मांडली. पूजेमध्ये हळद-कुंकू, अक्षता, बिबे, कागदी चिठ्ठयांची मांडणी ठेवून काही चिठ्ठयाही टाकल्या होत्या. पूजा मांडली त्या ठिकाणी नवीन दुचाकी ठेवली होती. त्या गाडीची सीट पेटवून दिली, तसेच भावाच्या पत्नीचे कपडेही पेटवून दिले.
advertisement
दोन दिवसांत तीन वेळा वाळू घातलेल्या साड्या, बाथरूम जवळ ठेवलेले कपडे, अंगणात वाळू घातलेले साडी जाळली, एका चिठ्ठीमध्ये 'तू बांधलेले घर पाड नाही तर तुझ्या बायकोला जिवे मारतो,' असे लिहिलेले आढळले आहे. या सगळ्या प्रकारामुळे भयभीत झालेल्या नवनाथ दिगंबर बोंढारे यांच्या तक्रारीवरून बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध जादूटोणा केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास केला जात आहे.
advertisement
अवघ्या दोन तीनवेळा असा अघोरी प्रकार घडल्याने बोंढारे कुटुंबासह आसपासचे सर्व नागरिक भयभयीत झाले आहेत. हा भानामतीचा प्रकार नक्की कुणी केला? बोंढारे कुटुंबीयांची कुणाशी दुश्मनी आहे का? याचा तपासही पोलीस करत आहेत.
Location :
Hingoli,Maharashtra
First Published :
May 24, 2025 11:18 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नवीन घरात अचानक कपडे जळाले, हळद-कुंकू पडली, अघोरी कांड बघून कुटुंब हादरलं, नेमकं काय घडलं?