Maharashtra politics : मोठी बातमी! शिंदेंचा ठाकरे गटाला मोठा धक्का; निष्ठावंत शिलेदारानं सोडली उद्धव ठाकरेंची साथ
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री शिंदेंनी आणखी एक मोठा धक्का दिला आहे.
हिंगोली, मनीष खरात, प्रतिनिधी : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून हिंगोलीमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छूक होते. मात्र तिकीट न मिळाल्यानं ते पक्षावर नाराज होते. अखेर त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे. जयप्रकाश मुंदडा यांच्या शिवसेना प्रवेशामुळे जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंदडा यांनी मुंबईमध्ये शिवसेनेते प्रवेश केला. हिंगोलीचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, वसमतचे तालुकाप्रमुख राजू चापके, ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांची देखील यावेळी उपस्थिती होती. शिवसेना ठाकरे गटाने हिंगोली लोकसभेचे तिकीट नाकारल्यापासून माजी मंत्री मुंदडा हे पक्षावर नाराज होते. अखेर या नाराजीतून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
advertisement
दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यावेळी अनेक बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. मात्र मुंदडा यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याची भूमिका घेतली. ते लोकसभेसाठी इच्छूक होते, मात्र तिकीट न मिळाल्यानं नाराज झालेल्या जयप्रकाश मुंदडा यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Location :
Hingoli,Hingoli,Maharashtra
First Published :
Jun 15, 2024 9:04 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
Maharashtra politics : मोठी बातमी! शिंदेंचा ठाकरे गटाला मोठा धक्का; निष्ठावंत शिलेदारानं सोडली उद्धव ठाकरेंची साथ










