Manoj Jarange: मोठी बातमी! भाजप नेत्याबद्दल मनोज जरांगे नको ते बोलले, प्रकाश आंबेडकरांकडून पाठराखण
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
भाजप नेते प्रसाद लाड यांच्यावर मनोज जरांगे पाटलांनी खालच्या पातळीवर जात टीका केली होती. त्यावर आता प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे...
हिंगोली: मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जंग जंग पछाडले आहे. मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. लवकरच मराठा समाजाची बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. सरकारने अद्यापही सगे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी कोणतेही ठोस पाऊस उचललं नसल्याचं दिसत आहे, अशात संतापलेल्या मनोज जरांगे पाटलांनी भाजप नेते प्रसाद लाड यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यावर सत्ताधारी आणि विरोधी गटातून विरोध झाला. या घटनेवर आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हटले होते मनोज जरांगे:
माध्यमांना प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटलांना देवेंद्र द्वेष झालाय, असं भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले होते. त्यानंतर संतापलेल्या मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया देताना प्रसाद लाड भ्रष्टाचारी नेते आहेत, असं म्हटलं. त्याचबरोबर लाड यांना उद्देशून जरांगेंनी अर्वाच्च शिवीगाळ देखील केली. पुढे त्यांनी प्रसाद लाड यांचा बांडगूळ असा उल्लेख केला होता. त्यावर लाड यांनी काही काळानंतर प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगेंनी माझ्यासोबत चर्चेसाठी यावं असं आवाहन प्रसाद लाड यांनी केलं.
advertisement
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले:
या संपूर्ण प्रकरणाबद्दल माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "मनोज जरांगे यांनी जाहीर केल्याप्रमाणे 288 जागा लढवण्याची तयारी केली पाहिजे. ग्रामीण भाषेत एखादा शब्द चुकून माकून येतो, अनावधानाने किंवा जाणीवपूर्वक येत असेल तरी. " प्रकाश आंबेडकर असं म्हटल्याने त्यांनी नकळत मनोज जरांगेंची पाठराखण केली असा सवाल निर्माण झाला आहे.
advertisement
त्यामुळे आता प्रकाश आंबेडकरांचा सल्ला मनोज जरांगे किती मनावर घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे सरकारने जरांगेनी दिलेली डेडलाईन पाळलेली दिसत नाही. त्यामुळे मनोज जरांगेंनी आता पुन्हा उपोषण सुरू केलं आहे. तर जरांगेंनी संयमी भूमिका घ्यावी, सरकार आपली जबाबदारी नक्की पार पाडेल, असं मंत्री शंभूराज देसाईंनी म्हटलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 20, 2024 5:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
Manoj Jarange: मोठी बातमी! भाजप नेत्याबद्दल मनोज जरांगे नको ते बोलले, प्रकाश आंबेडकरांकडून पाठराखण