Hingoli News : सुनेच्या अंगावर पाणी फेकलं; सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
हिंगोलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना चर्चेचा विषय बनली आहे.
हिंगोली, 15 डिसेंबर, मनीष खरात: हिंगोलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनेच्या अंगावर धुण्याचं पाणी फेकल्यानं सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पुल या गावात घडली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, भावजय अगोदर आंघोळीला जात आहे, म्हणून नणंदेला राग आला. त्यानंतर तिने तिच्या अंगावर धुण्याचं पाणी टाकलं. यावरून वाद सुरू झाला. या वादात नंतर सासू-सासरेही उतरले. सासू -सासऱ्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप सुनेनं केला आहे.
दरम्यान या प्रकरणात आता सुनेच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात नणंद व सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
Location :
Hingoli,Hingoli,Maharashtra
First Published :
December 15, 2023 9:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
Hingoli News : सुनेच्या अंगावर पाणी फेकलं; सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल


