Ashadhi Wari : पंढरपूरहून घरी परतणाऱ्या वारकऱ्यावर काळाचा घाला; हिंगोलीच्या आजोबांनी एसटीत सोडला जीव

Last Updated:

Ashadhi Wari : आषाढी वारीसाठी पंढरपूरला गेलेल्या वारकऱ्याचा घरी येताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

News18
News18
हिंगोली, (मनीष खरात, प्रतिनिधी) : आषाढी एकादशीनिमित्त राज्यासह देशभरातून असंख्य वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटात पोहचले. मजलदरमजल करत पायी दिंडीतून तर कोणी वाहनातून लाडक्या विठुरायाचं एकदा दर्शन घेण्यासाठी आज पंढरपूरमध्ये जमले होते. विठ्ठल रूक्मीणीचे रूप डोळ्यात साठवून कित्येक वारकरी घराच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान, अशाच एका घरी येणाऱ्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
भाविकावर काळाचा घाला
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोंडाळा येथील पंढरपूरला गेलेल्या 60 वर्षीय वारकऱ्याचा गावी परत येताना एसटी बसमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रामराव रहाटे असं या मयत वारकऱ्याचे नाव आहे. ते आषाढी वारीसाठी पायी दिंडीमध्ये पंढरपूरला गेले होते. परंतु, त्यांची तब्येत बिघडल्याने आज ते एका सहकाऱ्यासह एसटी बसने गावाकडे परत निघाले होते. दरम्यान आज सायंकाळी एसटी बस सेनगावला पोचण्यापुर्वी त्यांना श्वसनाचा त्रास झाला होता आणि प्रवासातच त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने गोंडाळा गावावर शोककळा पसरली आहे.
मराठी बातम्या/हिंगोली/
Ashadhi Wari : पंढरपूरहून घरी परतणाऱ्या वारकऱ्यावर काळाचा घाला; हिंगोलीच्या आजोबांनी एसटीत सोडला जीव
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement