मोठी बातमी! मराठवाड्यात भूकंप; साखर झोपेत असतानाच बसले हादरे
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. हिंगोली जिल्ह्यात आज पहाटे पाच वाजून नऊ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
हिंगोली, 20 नोव्हेंबर, मनीष खरात : जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. हिंगोली जिल्ह्यात आज पहाटे पाच वाजून नऊ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हिंगोलीच्या वसमत कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यातील दहा ते बारा गावांत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंप मापक यंत्रावर 3.5 रिस्टर स्केल एवढी या भूकंपाची नोंदी झाली आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.
हिंगोलीच्या वसमत, कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यातील दहा ते बारा गावांत हे भूकंपाचे धक्का जाणवले आहेत. दरम्यान या गावांमध्ये नेहमीच भूगर्भातून गुढ आवाज येत असतात अशी माहिती येथील स्थानिकांनी दिली आहे. पहाटेच्या सुमारास अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.
आज पहाटेच्या सुमारास अचानक भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे पाच सुमारास ही घटना घडली आहे. मात्र या घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली आहे.
Location :
Hingoli,Hingoli,Maharashtra
First Published :
November 20, 2023 8:27 AM IST


