Hingoli : आवाज आला, जमीन हादरली; भूकंपानंतर गावकऱ्यांमध्ये गोंधळ, CCTV व्हिडीओ आला समोर
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
हिंगोलीतल्या माळधामणी गावामध्ये आज सकाळी भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर नागरिक भयभीत झाले.
मनिष खरात, हिंगोली : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज भूकंपाचे धक्के बसले. सकाळी सात वाजून २० मिनिटांच्या सुमारास भूकंप झाला. सौम्य धक्के आणि जमिनीत गूढ आवाजामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन ते तीन वेळा भूकंपाचे हे धक्के बसले. काही सेकंदासाठी जमीन हादरल्यानं नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. याचे व्हिडीओसुद्धा आता व्हायरल होत आहेत.
हिंगोलीतल्या माळधामणी गावामध्ये आज सकाळी भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर नागरिक भयभीत झाले. गावात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. गावातले लोक नेहमीप्रमाणे त्यांच्या कामात असतानाच अचानक आवाज झाला आणि जमीन हादरली. तीन ते चार सेकंदासाठी झालेला हा प्रकार सुरुवातीला कोणाच्याच लक्षात आला नाही. पण जमीन हादरल्याने लोकांमध्ये गोंधळ उडाला. काही वेळाने लोकांना हा भूकंप असल्याची जाणीव झाली.
advertisement
हिंगोलीतील माळधामणी गावात भूकंपाचा धक्का, गावातील सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर#Maharashtra #Hingoli #Earthquake #VideoViral pic.twitter.com/JenNixwO7W
— News18Lokmat (@News18lokmat) July 10, 2024
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागात जाणवले भूकंपाचे सौम्य झटके बसले. तर परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यातील काही भागात सकाळी सात वाजेच्या सुमारास धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं. हिंगोली जिल्यात ४.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 10, 2024 11:08 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
Hingoli : आवाज आला, जमीन हादरली; भूकंपानंतर गावकऱ्यांमध्ये गोंधळ, CCTV व्हिडीओ आला समोर