WhatsApp वर 'पीएम किसान अॅप'ची लिंक आली अन् शेतकऱ्यांचे लाखो रुपये गायब
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Pm Kisan App : हिंगोलीमध्ये पीएम किसानच्या नावाखाली 7 शेतकऱ्यांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे.
हिंगोली, (मनीष खरात, प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना सावध करणारी बातमी हिंगोलीतून समोर आली आहे. पीएम किसान अॅपच्या लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्यांचं बँक खातं रिकामं झालं आहे. वसमत तालुक्यातील गिरगाव येथील शेतकऱ्यांची हॅकर्सनी ऑनलाईन लूट केली आहे. सध्या व्हॉट्सअप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पीएम किसान अॅप या अॅपची लिंक व्हायरल होत आहे. अनेक शेतकरी या लिंकला क्लिक करतात. क्लिक केल्यानंतर तात्काळ बँकांचे ओटीपी यायला सुरुवात होते. आणि काही कळण्याच्या आत बँक खात्यांमधून सर्व रक्कम परस्पर काढल्या जात आहे. गिरगाव मधील जवळपास 7 शेतकऱ्यांना या लिंकवर क्लिक करणे चांगलेच महागात पडलं आहे.
काय आहे प्रकरण?
पी एम किसान ॲपच्या नावाखाली हॅकर्सकडून शेतकऱ्यांची अशी फसवणूक केली जात आहे. याला अनेक शेतकरी बळी पडत आहेत. हिंगोलीतील या काही शेतकऱ्यांची फसवणूक मात्र समोर आली आहे. हे शेतकऱ्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. सोशल मीडियावर अशा कोणत्याही ॲपच्या लिंकला क्लिक करू नये आणि अशी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास तात्काळ 1930 या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन हिंगोली पोलिसांनी केले आहे.
advertisement
सायबर तक्रार कुठे कराल?
दूरसंचार विभागाने नागरिकांनी सायबर गुन्हे किंवा आर्थिक फसवणूक झाल्यास सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांक 1930 किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे.
Location :
Hingoli,Maharashtra
First Published :
Jun 29, 2024 10:48 PM IST










