...तर स्वत:ला वाचवा; हिंगोलीच्या खासदाराला दहशतवादी पन्नूने लंडनमधून दिली धमकी
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
पोलिसांनी २२ डिसेंबरपासून हेमंत पाटील यांची सुरक्षा वाढवली आहे. लंडनमधून खासदार हेमंत पाटील यांना फोनवरून धमकी देण्यात आली.
हिंगोली, 23 डिसेंबर : हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना खलिस्तानी दहशतवादी गुरदीपसिंह पन्नू याने लंडनमधून फोन करून धमकी दिली आहे. दिल्लीत २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात हल्ला करण्याची धमकी दिल्याचं खासदार हेमंत पाटील यांनी म्हटलं आहे. याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून माहिती दिलीय. दरम्यान, धमकीनंतर हेमंत पाटील यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.
खासदार हेमंत पाटील यांना १४ डिसेंबरला रात्री धमकी देणारा फोन आला. त्यांनी धमकीबाबतची माहिती पत्राद्वारे देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलीय. लंडन येथून आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकावरून धमकीचा कॉल आला असून केंद्र आणि राज्य सरकारला तेव्हाच कळवले असल्याचं हेमंत पाटील यांनी सांगितलं.
advertisement
पोलिसांनी २२ डिसेंबरपासून हेमंत पाटील यांची सुरक्षा वाढवली आहे. लंडनमधून खासदार हेमंत पाटील यांना फोनवरून धमकी देण्यात आली. पन्नू नावाच्या दहशतावाद्याने धमकी देताना २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या कार्यक्रमात स्फोट घडवू, स्वत:ला वाचवायचं असेल तर वाचवा अशी धमकी दिल्याचं हेमंत पाटील यांनी म्हटलंय.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 23, 2023 12:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
...तर स्वत:ला वाचवा; हिंगोलीच्या खासदाराला दहशतवादी पन्नूने लंडनमधून दिली धमकी


