Manoj Jarange Patil : 'ओबीसीच नाही तर 'त्या' समाजाच्या नेत्यांनाही पाडा'; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य

Last Updated:

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज त्यांची हिंगोलीमध्ये पत्रकार परिषद पार पडली.

News18
News18
छत्रपती संभाजीनगर, सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज त्यांची हिंगोलीमध्ये पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनाच विरोध का? असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की ' छगन भुजबळ यांनी ओबीसी मराठा वाद लावला. धनगर मराठा वाद लावला. आम्ही ओबीसीमध्ये गेल्याने धनगर समाजाला धक्का लागत नाही. धनगर समाजाचे नेते आमचे शत्रू नाहीत. म्हणून मी त्यांना शत्रू समजत नाही. आमचा शत्रू फक्त एकच ते म्हणजे छगन भुजबळ' असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, 'समाजाची खदखद आहे, म्हणून ते आंदोलनात सहभागी होत आहेत. लोकांचा हा आक्रोश आहे, ही भावना सरकारने समजून घ्यावी.' दरम्यान त्यांनी यावेळी बोलताना छगन भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 'हाकेंना विरोधक मानत नाही, सगळा कर्ता करविते भुजबळ हे आहेत. छगन भुजबळ जे करतायत ते सामान्य लोकांना चांगलं वाटत नाही, आमच्या नोंदी सापडलेल्या असताना नाही म्हणणं, मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या असताना आपला नेता मराठ्यांना का आरक्षण द्यायचं नाही म्हणतो असं सामान्य ओबीसी लोकांना वाटतं? म्हणून ओबीसी देखील आंदोलनात सहभागी होत आहेत,' असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
advertisement
'कुणबी मराठा एकच आहे, त्यामुळे ओबीसीतून आरक्षण देण्याची पहिल्या दिवसापासून आमची मागणी आहे. ओबीसींच्याच नाही तर मराठ्यांना त्रास देणाऱ्या मराठ्यांच्या नेत्यांना देखील पाडा, मराठ्यांना त्रास व्हायला नको. आमची कोणतीही मागणी बदललेली नाही. भुजबळ यांनी 10-20 लोक हाताशी धरले आणि त्यांना ते बोलायला लावत आहेत' असंही जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
Manoj Jarange Patil : 'ओबीसीच नाही तर 'त्या' समाजाच्या नेत्यांनाही पाडा'; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य
Next Article
advertisement
BJP Shiv Sena Shinde:  पहाटे १०० पोलीस घरात घुसले! झाडाझडतीनंतर शिंदे गटाच्या शिलेदाराचा स्फोटक आरोप
पहाटे १०० पोलीस घरात घुसले! झाडाझडतीनंतर शिंदे गटाच्या शिलेदाराचा आरोप
  • पहाटे १०० पोलीस घरात घुसले! झाडाझडतीनंतर शिंदे गटाच्या शिलेदाराचा आरोप

  • पहाटे १०० पोलीस घरात घुसले! झाडाझडतीनंतर शिंदे गटाच्या शिलेदाराचा आरोप

  • पहाटे १०० पोलीस घरात घुसले! झाडाझडतीनंतर शिंदे गटाच्या शिलेदाराचा आरोप

View All
advertisement