रात्री घरी न जाता एसटीच्या विश्राम गृहातच झोपला; सकाळी मृतदेह आढळला, चालकाच्या मृत्यूनं हिंगोली हादरलं
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
हिंगोलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.
हिंगोली, 6 ऑक्टोबर, मनीष खरात : हिंगोलीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हिंगोली बसस्थानक परिसरात चालकाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. सुरेश सलामे असं या चालकाचं नावं आहे. ते रात्री उशिरा शहरात लातूर-हिंगोली बस घेऊन आले होते. उशिर झाल्याने घरी न जाता सलामे हे आगारातील विश्रामगृहातच झोपले होते. मात्र सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोली एसटी बसस्थानक परिसरात चालकांसाठी असलेल्या विश्रामगृहात सुरेश सलामे या एसटी चालकाचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकारानं एकच खळबळ उडाली आहे. सुरेश सलामे हे रात्री उशिरा लातूर-हिंगोली बस घेऊन हिंगोली बसस्थानकात आले होते.
परंतु रात्री उशिर झाल्यानं ते घरी न जाता आगारातील विश्रामगृहातच झोपले. मात्र आज सकाळी ते मृतावस्थेमध्ये आढळून आले आहेत. त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला? हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाहीये.
Location :
Hingoli,Hingoli,Maharashtra
First Published :
Oct 06, 2023 1:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
रात्री घरी न जाता एसटीच्या विश्राम गृहातच झोपला; सकाळी मृतदेह आढळला, चालकाच्या मृत्यूनं हिंगोली हादरलं










