advertisement

Hingoli News : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; तरुणाला आईनेच शिकवला धडा, बदड बदड बदडलं अन्...

Last Updated:

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला त्याच्या आईने चांगलाच धडा शिकवला आहे.

News18
News18
हिंगोली, मनीष खरात, प्रतिनिधी : हिंगोलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला त्याच्या आईने चांगलाच धडा शिकवला आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल या तरुणाच्या आईनं तरुणाला तंबी देत त्याला चारचौघात कान धरायला भाग पाडलं, एवढंच नाही तर त्याला चोप देखील दिला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील केळी गावात सोशल मीडियावर वादग्रस्त मजकूर टाकल्याने एका तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे. परंतु पोलीस गावात येण्यापूर्वीच त्या तरुणाच्या आईला ही गोष्ट कळाली. त्यानंतर आईने या तरुणाला पोलिसांसमक्ष व गावकऱ्यांसमक्ष तंबी देत चांगलाच चोप दिला आहे. सामाजिक वातावरण बिघडवणारी अशी पोस्ट का केलीस? म्हणत आईने व मोठ्या भावाने या तरुणाचे चारचौघात कान पकडले आहेत. एक चांगला आदर्श या आईने घालून दिला आहे. या घटनेची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.
advertisement
याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओमध्ये ग्रामस्थ घटनास्थळी जमल्याचं दिसत आहे. आईने चेपलेनं या तरुणाला चोप दिला आहे. तसेच अशी पोस्ट का केलीस असा सवाल करत तरुणाला चांगलीच तंबी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
Hingoli News : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; तरुणाला आईनेच शिकवला धडा, बदड बदड बदडलं अन्...
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement