Railway Ticket Fare Hike : मोठी बातमी! 1 जुलैपासून रेल्वेची भाडेवाढ होणार, लोकलचे तिकीट दर किती होणार?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Railway Ticket Fare Hike रेल्वे मंत्रालय 1 जुलै 2025 पासून नवीन भाडे रचना लागू करण्याच्या तयारीत असून, यामध्ये दूर अंतराच्या प्रवासासाठी किरकोळ वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.
प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी, नवी दिल्ली: मागील काही वर्षांपासून रेल्वेची दरवाढ झाली नव्हती. आता मात्र, 1 जुलैपासून रेल्वेच्या तिकिट दरात आता वाढ होणार आहे. मात्र, ही दरवाढ काही श्रेणींसाठी लागू होणार असून किमान दरवाढ ही एक पैसा प्रति किलोमीटर इतकी आहे.
रेल्वे मंत्रालय 1 जुलै 2025 पासून नवीन भाडे रचना लागू करण्याच्या तयारीत असून, यामध्ये दूर अंतराच्या प्रवासासाठी किरकोळ वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून रेल्वेच्या तिकिट दरात थेटपणे वाढ करण्यात आली नव्हती. देशातील गरीब, मध्यमवर्गीय असलेल्या कोट्यवधी प्रवाशांसाठी रेल्वेचा प्रवास हा अतिशय परवडणारा आहे. तर, भारतात रेल्वेचा प्रवास हा अतिशय स्वस्त समजला जातो.
advertisement
>> नवीन प्रस्तावित भाडे रचना काय?
500 किमी पर्यंतच्या सामान्य द्वितीय श्रेणी भाड्यात कोणताही बदल नाही.
500 किमी पेक्षा अधिक अंतरासाठी द्वितीय श्रेणीच्या नॉन-एसी गाड्यांमध्ये प्रति किलोमीटर अर्धा पैसा वाढविण्यात येणार आहे.
मेल/एक्सप्रेस (नॉन-एसी) गाड्यांमध्ये प्रति किलोमीटर 1 पैशाची वाढ होईल.
एसी वर्गात प्रति किलोमीटर 2 पैशांची वाढ होऊ शकते.
advertisement
>> लोकलच्या प्रवाशांना दिलासा...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनगरीय लोकल गाड्यांच्या भाड्यात कोणतीही वाढ होणार नाही. तसेच, मासिक सीझन तिकीट (MST) देखील मागील दरांवरच उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे मुंबई, कोलकाता, चेन्नई यांसारख्या शहरांत लोकलने प्रवास करणाऱ्या कोटी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Location :
New Delhi,New Delhi,Delhi
First Published :
June 24, 2025 3:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Railway Ticket Fare Hike : मोठी बातमी! 1 जुलैपासून रेल्वेची भाडेवाढ होणार, लोकलचे तिकीट दर किती होणार?