ट्रेनमध्ये घरून डबा नेणं पडणार महागात, अन्यथा...; रेल्वेचा नियम माहितीये का तुम्हाला?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
रेल्वेने जात असताना अनेक प्रवासी घरातून जात असताना ट्रेनमध्ये खाण्यासाठी टिफिन नेत असतात. जर तुम्ही शिल्लक राहिलेलं अन्न ट्रेनमध्ये किंवा रेल्वे स्थानकावर फेकले तर तुम्हाला आता दंड भरावा लागणार आहे.
अवघ्या काही दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे. या सणानिमित्त अनेक नोकरदार आपल्या गावी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जात असतात. नोकरदार वर्ग रेल्वेचा पर्याय निवडत असतात. रेल्वेने जात असताना अनेक प्रवासी घरातून जात असताना ट्रेनमध्ये खाण्यासाठी टिफिन नेत असतात. जर तुम्ही शिल्लक राहिलेलं अन्न ट्रेनमध्ये किंवा रेल्वे स्थानकावर फेकले तर तुम्हाला आता दंड भरावा लागणार आहे. जर तुम्हीही आता दिवाळी निमित्त रेल्वेने गावी जाणार असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी आहे.
अनेकदा प्रवासी ट्रेनमध्ये घरी बनवलेले अन्न घेऊन जातात. मात्र, खाल्ल्यानंतर उरलेले अन्न ट्रेन किंवा स्थानकात ते फेकून देतात. जर का आता प्रवाशांनी अन्न फेकून दिले, तर त्यांना आता दंड भरावा लागणार आहे. भारतीय रेल्वेकडून लांबपल्ल्याच्या गाड्या, लोकल आणि रेल्वे स्थानके स्वच्छ ठेवण्यासाठीचा विशेष प्रयत्न करत आहे. कचरा टाकणाऱ्यांविरोधात आणि धूम्रपान करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई सुरू आहे. सप्टेंबर महिन्यापासूनच भारतीय रेल्वेकडून कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे.
advertisement
महाराष्ट्रासह देशातील इतर प्रमुख रेल्वे स्थानकांवर रेल्वेच्या अधिकार्यांकडून कारवाई केली जात आहे. प्रवासी घरी शिजवलेले अन्न खाऊन उरलेला कचरा ट्रेन किंवा स्थानकात टाकतात, ज्यामुळे घाण पसरते. रेल्वे कर्मचारी अशा प्रवाशांना पकडून दंड ठोठावत आहेत. भारतीय रेल्वेने प्रवाशांना स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. कचरा टाकणे, थुंकणे, धूम्रपान यासारख्या सवयी टाळाव्या आणि नियमांचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाई होईल. अनेक प्रवासी एक्सप्रेसमध्ये गुटख्यासह अनेक अंमली पदार्थ खाऊन थुकत असतात. त्यामुळे रेल्वे स्थानकासह गाड्याही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खराब होतात.
Location :
Maharashtra
First Published :
October 12, 2025 7:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ट्रेनमध्ये घरून डबा नेणं पडणार महागात, अन्यथा...; रेल्वेचा नियम माहितीये का तुम्हाला?