फिट्सचा त्रास, उलट्या अन्... मृत्यूपूर्वी शिरीष गवसची झालेली वाईट अवस्था, पत्नीने सांगितलं शेवटच्या क्षणी काय घडलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
रेड सॉइल स्टोरीजचे निर्माता शिरीष गवस यांचे मेंदूतील ट्युमरमुळे अकाली निधन झाले. पूजा गवसने त्यांच्या शेवटच्या दिवसांचा भावनिक प्रवास शेअर केला.
मुंबई : कोकणी आणि मराठी प्रेक्षकांमध्ये आपल्या खास 'देसी कंटेंट' मुळे लोकप्रिय झालेल्या 'रेड सॉइल स्टोरीज' या युट्यूब चॅनलचा निर्माता शिरीष गवस यांचे अकाली निधन झाल्याने मोठी हळहळ व्यक्त झाली होती. मेहनतीने लाखोंच्या घरात पोहोचलेल्या या चॅनेलच्या निर्मात्याने वयाच्या तिशीतच जगाचा निरोप घेतल्यामुळे अनेकांना धक्का बसला.
advertisement
अखेर, शिरीषच्या पत्नीने, पूजा गवस हिने चॅनलवर एक भावनिक व्हिडिओ शेअर करून शिरीषच्या मृत्यूमागील कारण आणि शेवटच्या दिवसांचा हृदय पिळवटून टाकणारा प्रवास चाहत्यांसमोर मांडला आहे.
advertisement
पूजाने सांगितले की, शिरीषच्या त्रासाची सुरुवात मार्चमध्ये सर्दी आणि डोकेदुखीने झाली, ज्याला डॉक्टरांनी सायनस असल्याचे सांगितले. त्यानंतर मे महिन्यात किडनीमध्ये ११ मिमीचा स्टोन असल्याचे निदान झाल्यावर त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर शिरीष बरा झाला आणि तो मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या तयारीला लागला.
advertisement
पण मृत्यूच्या अवघ्या १५ दिवस आधी त्याला उलटी, पित्त आणि सतत चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला. पोटात अन्नपाणी टिकत नव्हते. अचानक तब्येत बिघडल्यावर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. याच दरम्यान त्याला पहिला फीट आला.
advertisement
फीट्सचा त्रास वाढल्यावर त्याला गोव्यातील नामांकित रुग्णालयात नेले. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य डॉक्टर असल्याने त्यांनी वेळ न गमावता 'सीटी ब्रेन' टेस्ट केली. याचवेळी त्याचा त्रास वाढला आणि तो बेशुद्ध झाला. रिपोर्ट्समधून धक्कादायक खुलासा झाला: शिरीषच्या मेंदूत ट्युमर असून त्यात पाणी भरले होते!
advertisement
मुंबईला नेणे शक्य नसल्याने त्याला गोव्याच्या जीएमसी बंबोळी येथे हलवण्यात आले. दुर्दैवाने, केवळ दोन-तीन तासांतच शिरीष कोमामध्ये गेला. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून मेंदूतील पाणी आणि रक्ताच्या गाठी काढल्या.
advertisement
परिस्थिती सुधारल्यावर ट्युमरचे ऑपरेशन करायचे ठरले. सात-आठ तासांच्या या जोखमीच्या शस्त्रक्रियेत डॉक्टरांना ट्युमरचा केवळ २०-३० टक्के भागच काढता आला. हा ट्युमर मेंदूच्या अत्यंत नाजूक भागात होता, ज्यामुळे तो पूर्ण काढला असता तर मेमरी लॉस किंवा बोलण्या-चालण्याच्या समस्या उद्भवल्या असत्या.
advertisement
काही दिवसांनी शिरीष बरा होत असतानाच, अचानक त्याला ताप आला. तपासणीत मेंदूतील पाणी आणि लघवीमध्ये इन्फेक्शन झाल्याचे निदान झाले. त्याला पुन्हा आयसीयूमध्ये हलवण्यात आले आणि अखेर, पुढील ५ दिवसांनी शिरीषने सर्वांना सोडले. रिपोर्टनुसार, हा ट्युमर त्याला लहानपणापासूनच होता, पण पूर्ण वाढ न झाल्याने त्याची लक्षणे दिसली नव्हती.
advertisement