Vaibhav Suryavanshi : वैभव सुर्यवंशीचं भविष्य अंधारात? ऑस्ट्रेलिया दौरा गाजवूनही संघात निवड होणार नाही?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा युवा स्टार क्रिकेटपटू वैभव सुर्यवंशीने नुकताच ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला आहे. या दौऱ्यात त्याने पुन्हा एकदा फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली होती. या दौऱ्यानंतर आता वैभव सुर्यवंशीचं भविष्य अंधारात जाण्याची शक्यता आहे.
येत्या 15 ऑक्टोबरपासून रणजी ट्रॉफी 2025-26 ला सूरूवात होणार आहे. या स्पर्धेला अवघे तीन दिवस उरले असताना अद्याप बिहारचा संघ निवडला गेला नाही आहे. कारण बिहारकडे या हंगामासाठी संघ निवडण्यासाठी निवडकर्त्यांची कमतरता आहे. वरिष्ठ निवड समितीतील तीन पदे रिक्त आहेत आणि केवळ दोन निवडकर्त्यांसह, बिहार क्रिकेट असोसिएशन (बीसीए) या देशांतर्गत स्पर्धेसाठी संघ निवडण्याच्या स्थितीत नाही. अशा परिस्थितीत वैभव सूर्यवंशी सारख्या प्रतिभावंत खेळाडूंचे भविष्य अधांतरी आहे.
advertisement
बीसीए अधिकाऱ्यांच्या मते, रिक्त तीन पदे भरण्यासाठी असोसिएशनने बीसीसीआयकडे औपचारिक परवानगी मागितली आहे. या संदर्भात बीसीएचे महाव्यवस्थापक (प्रशासन) नीरज सिंग म्हणाले की, 29 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेनंतर ही प्रक्रिया जवळजवळ पूर्ण होईल, परंतु वेळ संपत आली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार,नीरज सिंग म्हणाले की, रिक्त निवडकर्त्यांच्या पदांसह सर्व बाबींवर 29 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान चर्चा झाली. बीसीसीआय पुढील 2-3 दिवसांत निवडकर्त्यांच्या नियुक्तीची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे.
advertisement
दरम्यान, रिक्त जागांसाठी खूप कमी उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ज्यामुळे 15 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवीन स्थानिक हंगामामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. यावेळी, बिहारला प्लेट ग्रुपमध्ये स्थान देण्यात आले आहे, ज्यामध्ये अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मणिपूर, मेघालय आणि मिझोरम या संघांचा समावेश आहे. दरम्यान बिहारचा पहिला सामना 15 तारखेला पाटण्यातील मोईन-उल-हक स्टेडियमवर अरुणाचल प्रदेशविरुद्ध असणार आहे.
advertisement
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वैभवच्या धावा
view commentsदरम्यान वैभव सुर्यवंशीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील 3 युथ वनडे सामन्यात 124 धावा केल्या होत्या.या खेळीत त्याने 1 अर्धशतक ठोकलं होतं. तसेच दोन टेस्ट सामन्यात वैभव सुर्यवंशीने 133 धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने एक शतक ठोकलं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 12, 2025 5:44 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : वैभव सुर्यवंशीचं भविष्य अंधारात? ऑस्ट्रेलिया दौरा गाजवूनही संघात निवड होणार नाही?