'...म्हणूनच नियतीने तुला एवढं कमी आयुष्य दिलं'; सोशल मीडिया स्टार शिरीष गवसबद्दल पत्नी असं का बोलली?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Shirish Gavas : सोशल मीडिया स्टार शिरीष गवसचे दोन महिन्यांपूर्वी दु:खद निधन झाले. आता त्याची पत्नीन पूजा गवसने त्याच्या Red Soil Stories या युट्यूब चॅनलची पुन्हा एकदा त्याच जोमात सुरुवात केली आहे.
कोकणातील लोकप्रिय युट्यूबर शिरीष गवसचे 1 ऑगस्ट 2025 रोजी दु:खद निधन झाले. त्यामुळे 'रेड सॉइल स्टोरीज'च्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता पतीच्या निधनानंतर दोन महिन्यांनी शिरीषची पत्नी पूजा गवसने पुन्हा एकदा 'सेड सॉइल स्टोरीज' त्याच जोमात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
'रेड सॉइल स्टोरीज' या युट्यूब चॅनलवर पूजाने शिरीषला श्रद्धांजलीपर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पूजा म्हणतेय,"शिरिष नावाप्रमाणेच एखाद्या सुगंधी फुलाप्रमाणे जीवन जगलास. मन भरून स्वच्छंदी. मनाचा मोठेपणा, विनम्रता, निस्वार्थ, आनंदी आणि अमर्याद हुशारी अशा कितीतरी गुणांनी परिपूर्ण असा तू. तुझ्यासारख्या रुबाबदार आणि हुशार व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात मी कधी पडले माझं मलाच कळलं नाही. शाळा-कॉलेजमधल्या ओळखीचं प्रेमात रुपांतर आणि पुढे लग्नसंसार. त्यानंतर रेड सोल स्टोरी या चॅलनची सुरुवात. त्यानंतर आपल्या लाडक्या श्रीजा बाळाचा जन्म. खूप वेगाने हे सगळं डोळ्यासमोरून जातंय".
advertisement
पूजा म्हणाली,"एक उत्तम माणूस, जबाबदार मुलगा, परफेक्ट नवरा आणि जीवापाड प्रेम करणारा प्रेमळ बाबा या सगळ्या जबाबदाऱ्या तू चोख निभावत होतास. का कोणास ठाऊक माझ्यासारख्या साध्या सरळ माणसांसाठी हे जग नाही, असं कायम तुला वाटायचं आणि कदाचित म्हणूनच नियतीने तुला एवढं कमी आयुष्य दिलं. कारण असं म्हणतात ना चांगलीच माणसं देवाला जास्त प्रिय असतात".
advertisement
पूजा पुढे म्हणाली,"चालतं-फिरतं गुगल म्हणायचे सगळे तुला. कधीही काहीही प्रश्न विचारा. सगळ्यातलं सगळं तुझ्या वाचणात असायचं. इतक्या कमी वेळात तू जे नाव कमावलं आहेस ते अशक्य आहे. आयुष्यात काहीतरी मोठं करायचंय या ध्येयाशी तू कायम ठाम राहिलास. रेड सॉईल स्टोरिज हे आपल्यासाठी फक्त चॅनल नसून खरंतर आपलं अपत्य आहे. कारण चॅनल सुरू झाल्यापासून मॉनीटाइड होण्यापर्यंत बरोबर नऊ महिन्यांचा कालावधी लागला. सेविंग केलेली पै आणि पै मोडून आपण प्रामाणिकपणे शूट करत राहिलो. पण जशी गाडी रुळावर आली त्यानंतर आपण कधी मागे वळून पाहिलंच नाही".
advertisement
पूजा पुढे म्हणतेय,"आता कुठे आपला संसार नीट सुरू झाला होता आणि अचानक एक चाक निखळून पडावं तसं तुझं जाणं झालं. श्रीजाच्या जन्मानंतर माझ्या आईला अचानक जावं लागलं असल्याने त्यावेळी माझी आणि श्रीजाची तुच आई बनलास. मी हे सगळं कसं विसरू. पण एक दिवस तुला श्रद्धांजली करणारा व्हिडीओ मला करावा लागेल असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. तुझ्या जाण्यानंतर अनेकांची मने हळहळली".
advertisement
आज Red Soil Stories हे चॅनल सुरू व्हावं म्हणून कितीतरी पूजाच्यामागे खंबीरपणे उभे आहेत. या सगळ्याचं श्रेय शिरीषला जातं.
advertisement
शिरीषच्या अचानक जाण्याने जेव्हा पूजा कोलमडून गेली होती तेव्हा कित्येकांनी तिला सांत्वनपण मेसेज केले. पूजा म्हणते,"शिरीष नाही हे ती मानतच नाही. या जन्मात शिरीषची पत्नी होण्याचं सौभाग्य तिला लाभलं याचा तिला सार्थ अभिमान आहे. पुढचा प्रत्येक जन्म जोडीदार म्हणून पूजाला शिरीषचं हवा आहे, तसं तिचं परमेश्वराकडे मागणं आहे.