एका मुलीसाठी सख्खे भाऊ बनले पक्के वैरी! रोमान्स, बदला आणि जबरदस्त सस्पेन्स; घरातल्यांसोबत चुकूनही पाहू नका
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Best Romantic Movie on OTT : या चित्रपटाची साधी प्रेमकथा ज्या हॉट अँड सिझलिंग अंदाजात पडद्यावर सादर करण्यात आली, त्याने संपूर्ण इंडस्ट्रीला धडकी भरवली.
मुंबई: २०१५ मध्ये एक असा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याचे बजेट मोठे नव्हते आणि स्टारकास्टही तशी रेग्युलर होती. पण, या चित्रपटाची साधी प्रेमकथा ज्या हॉट अँड सिझलिंग अंदाजात पडद्यावर सादर करण्यात आली, त्याने संपूर्ण इंडस्ट्रीला धडकी भरवली. साध्या खिचडीलाही जबरदस्त तडका मारून नवा फ्लेव्हर दिला, तर प्रेक्षक तो नक्की ट्राय करतात आणि हा चित्रपटही त्याच 'तडक्या'मुळे तुफान हिट ठरला.
advertisement
आज आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, त्याचे नाव आहे 'हेट स्टोरी ३'. हा चित्रपट वरवर पाहता एक ट्रायंगल लव्ह स्टोरी असला तरी, तो बॉलिवूडच्या इतर साध्या चित्रपटांसारखा नव्हता. शरमन जोशी, डेझी शाह, करण सिंग ग्रोव्हर आणि झरीन खान यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात प्रेम, द्वेष, रोमांस, बोल्डनेस, अॅक्शन आणि सस्पेन्स यांचे जबरदस्त मिश्रण आहे.
advertisement
विशाल पांड्या दिग्दर्शित 'हेट स्टोरी' फ्रँचायझीमधील ही तिसरी फिल्म आहे. यात कॉर्पोरेट दुश्‍मनीच्या आड लपलेलं 'प्रेम, विश्वासघात आणि प्रतिशोध' चा भयानक खेळ दाखवण्यात आला आहे.
advertisement
शरमन जोशीने (आदित्य दिवान) त्यांच्या नेहमीच्या विनोदी भूमिकेच्या बाहेर पडून गंभीर आणि तिखट भूमिका साकारून प्रेक्षकांना चकित केले, तर करण सिंग ग्रोव्हर (सौरव सिंघानिया) चा ग्रे-शेड असलेला महत्त्वाकांक्षी रोल स्टोरीचा कणा ठरली.
advertisement
कथेची सुरुवात होते यशस्वी व्यावसायिक आदित्य दिवान आणि त्याची पत्नी सिया दिवान (झरीन खान) यांच्या आनंदी नात्यातून. पण, त्यांच्या आयुष्यात रहस्यमय आणि व्यावसायिक सौरव सिंघानिया (करण सिंग ग्रोव्हर) याची एंट्री होते. सौरव आदित्यला एक मोठी बिझनेस डील ऑफर करतो, जी लवकरच एका धोकादायक जाळ्यात बदलते.
advertisement
सौरवच्या येण्याने आदित्य आणि सियाच्या आयुष्यात अराजकता, सस्पेन्स आणि वेदना सुरू होतात. हळूहळू उघड होते की, सौरवच्या मनात आदित्यविरुद्ध खोलवर दडलेला राग आहे. त्याची बदल्याची भावना भूतकाळातील एका दुःखद घटनेत दडलेली आहेत, जिथे हे दोन सख्खे भाऊ एका मुलीमुळे एकमेकांचे जानी दुश्मन बनतात.
advertisement
कथा पुढे सरकते तसे सिया, आदित्य आणि सौरव यांच्यात प्रेम, वासना आणि विश्वासघाताची धोकादायक मालिका सुरू होते. या चित्रपटाची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याचे बोल्ड सादरीकरण आणि त्याचे म्युझिक.
advertisement