Numerology: सासरी देखील यांचाच शब्द चालतो! या 4 जन्मतारखा असलेल्या महिला त्याबाबतीत नशीबवान

Last Updated:

Numerology: शास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचा जन्म एका विशिष्ट तारखेला, वेळेला आणि ठिकाणी होतो आणि ही जन्मतारीख त्यांच्या जीवनाची दिशा आणि व्यक्तिमत्त्व ठरवते. प्रत्येक जन्मसंख्येचा एक शासक ग्रह असतो.

News18
News18
मुंबई : अंकशास्त्रानुसार जन्मतारखेवरून व्यक्तीचा स्वभाव आणि बऱ्याच गोष्टी ओळखता येतात. काही मुली-महिलांना नशिबाची साथ चांगली असते, इतरांच्या तुलनेत कुटुंबात त्यांना आदर, सन्मान मिळतो. काही जन्मतारखांच्या मुली त्यांच्या बुद्धिमत्ता, साधेपणा आणि जबाबदारीच्या जाणिवेसाठी प्रसिद्ध असतात, ज्यामुळे त्या त्यांच्या सासू-सासऱ्यांच्याही विशेष लाडक्या बनतात.
अंकशास्त्र हे एक प्राचीन आणि रहस्यमय शास्त्र आहे, जन्म अंकांद्वारे एखाद्या व्यक्तीचे जीवन, चारित्र्य आणि नशिबाची माहिती देतं. कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ किंवा ३० तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक ३ असतो आणि त्या गुरु ग्रहाच्या प्रभावाखाली असतात. हिंदू धर्मात अंकशास्त्राला विशेष महत्त्व आहे. शास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचा जन्म एका विशिष्ट तारखेला, वेळेला आणि ठिकाणी होतो आणि ही जन्मतारीख त्यांच्या जीवनाची दिशा आणि व्यक्तिमत्त्व ठरवते. प्रत्येक जन्मसंख्येचा एक शासक ग्रह असतो.
advertisement
जबाबदार आणि संवेदनशील कुटुंबातील सदस्य - अंकशास्त्रानुसार, मूलांक ३ असलेल्या मुली त्यांच्या कुटुंबाचा आणि वडिलांचा आदर करण्यात निपुण असतात. त्या त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करतात आणि कुटुंबाला एकत्र ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. या स्वभावामुळे त्या त्यांच्या सासू-सासऱ्यांच्या लाडक्या सून बनतात.
advertisement
३ क्रमांकाच्या मुली सभ्य, इतरांच्या आदर करणाऱ्या आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या असतात. त्या त्यांच्या सासू आणि कुटुंबातील इतर लोकांशी प्रेमाने वागतात, ज्यामुळे सासरची मंडळी देखील त्यांच्याशी स्वतःच्या मुलीसारखे व्यवहार करतात.
अंकशास्त्रानुसार, मूलांक ३ असलेल्या मुली स्वभावाने खूप आनंदी आणि मिलनसार असतात. त्या त्यांच्या गोड आणि प्रेमळ वागण्याने सर्वांचे मन सहज जिंकून घेतात.
advertisement
शांतीप्रिय आणि संयमी स्वभाव - अंकशास्त्रानुसार, ३ क्रमांकाच्या मुली वाद आणि कलहांपासून दूर राहणे पसंत करतात. त्या कोणत्याही परिस्थितीला संयम आणि समजूतदारपणाने हाताळतात, ज्यामुळे कुटुंबात सलोखा आणि प्रेम टिकून राहतं. अशा मुली कुठेही असताना सर्वांचे मन जिंकतात, चांगल्या वागण्यानं आणि सकारात्मक विचारसरणीने संपूर्ण कुटुंबाला आनंदी ठेवतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: सासरी देखील यांचाच शब्द चालतो! या 4 जन्मतारखा असलेल्या महिला त्याबाबतीत नशीबवान
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement